अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump आणि त्यांची पत्नी Melania Trump यांना  COVID 19 ची लागण
अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Photo Credit-IANS)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्र्म्प (Donald Trump) आणि त्यांची  पत्नी मेलानिया ट्र्म्प (Melania Trump) यांची COVID 19 चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. दरम्यान डॉनल्ड ट्र्म्प यांचे सहकारी  आणि सल्लागार Hope Hicks यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून  राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्र्म्प आणि त्यांची मेलानिया ट्र्म्प यांची देखील कोविड 19 ची चाचणी करून घेण्यात आली होती. आज ( 2 ऑक्टोबर) दिवशी  ती पॉझिटिव्ह आली असून सध्या दोघेही क्वारंटीन असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. Donald Trump यांचे सल्लागार Hope Hicks ला COVID 19 ची लागण झाल्याने US President सोबतच First Lady Melania Trump क्वारंटीन

डॉनल्ड ट्र्म्प यांनी काही वेळापूर्वीच ट्वीटर अकाऊंटवरून त्यांना व त्यांच्या पत्नी मेलानिया ट्र्म्प यांना कोरोनाची लागण झाली असून आम्ही एकत्र यामधून बाहेर पडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

डॉनल्ड ट्रम्प ट्वीट

सध्या अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीची धामधूम सुरू आहे. नुकतीच 29 सप्टेंबर दिवशी पहिली डिबेट पार पडली. या कार्यक्रमासाठी जाताना ट्रम्प दांमप्त्यासोबत त्यांच्या सहाय्यकाने विमानप्रवास एकत्र केला होता.  Hope Hicks यांना कोरोनाची लागण झाल्याची  माहिती मिळताच ट्र्म्प यांनी तात्काळ कोरोनाची टेस्ट करून घेतली आहे. 3 नोव्हेंबरला अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आहे. यामध्ये त्यांच्यासमोर जो बायडन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आहेत.

सध्या जगातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा आकडा अमेरिकेमध्ये आहे. 7,494,671 पेक्षा अधिक कोरोनाबाधित अमेरिकेत आहेत.  आतापर्यंत 212,660 जणांचा अमेरिकेत कोविड 19 मुळे मृत्यू देखील झाला आहे. सध्या जगभरात कोरोनाबाधितांची आकडा 34,484,084

पर्यंत पोहचला आहे.