अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प (US President Donald Trump) आणि First Lady Melania Trump यांना क्वारंटीन करण्यात आले असून दोघांच्याही कोविड 19 चाचण्यांची प्रतिक्षा आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार Hope Hicks यांचा कोविड 19 अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यामुळे डॉनल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीला त्याचा धोका पाहता ही टेस्ट करण्यात आली आहे. Hope Hicks हे गुरूवारी आगामी राष्ट्रपती निवडणूकीच्या पहिल्या डिबेटसाठी त्यांच्यासोबत प्रवास करत होते. दोघेही एकाच विमानात होते.
डॉनल्ड ट्रम्प यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून त्यांची क्वारंटीनची प्रक्रिया सुरू झाल्याचं स्पष्ट करण्यात आले आहे. आम्ही टेस्ट केली असून त्याचा निकाल प्रतिक्षेमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
डॉनल्ड ट्रम्प यांचे ट्वीट
US President Donald Trump and First Lady Melania Trump to begin their quarantine process after his adviser, Hope Hicks tested positive for #COVID19. Their test results for COVID are awaited. pic.twitter.com/a0P4EQhpix
— ANI (@ANI) October 2, 2020
अमेरिकेमध्ये आता राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक प्रचार जोरात सुरू झाला आहे. मतदान प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठीदेखील तेथील प्रशासन काम करत आहे. CBC report च्या माहितीनुसार, गुरूवारी ट्रम्प दांपत्यांसोबत प्रेस सेक्रेटरी Kayleigh McEnany व सोशल मीडीया डिरेक्टर Dan Scavino येणार होते मात्र आयत्यावेळेस त्यांचे सहाकारी बदलण्यात आले.
जो बायडन आणि डॉनल्ड ट्रम्प हे 3 नोव्हेंबर दिवशी निवडणूकीचा सामना करणार आहेत. कमिशन ऑन प्रेसिडेन्शिअल डिबेट्स यांनी दुसर्या डिबेटचं आयोजन 15 ऑक्टोबर दिवशी फ्लोरिडातील मायामी शहरामध्ये केले आहे. तर तिसरी आणि अंतिम डिबेट 22 ऑक्टोबर दिवशी नॅशविलेमध्ये बेल्मॉन्ट युनिव्हर्सिटीत होणार आहे.