Air Pollution (PC - ANI)

Air Pollution: देशातील वायू प्रदूषणाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. दिल्ली-एनसीआरची स्थिती सर्वात वाईट आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत दिल्ली (Delhi) हे देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. देशातील चार प्रमुख शहरांमध्ये वायू प्रदूषण (Air Pollution) वाढले आहे, तर लखनऊ आणि पाटणा शहरात प्रदुषणामध्ये घट झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. न्यूज एजन्सी एएनआयने रेस्पिररच्या अहवालाचा हवाला देत म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यात दिल्लीमध्ये पीएम (पार्टिक्युलेट मॅटर) 2.5 ची पातळी देशातील सर्वोच्च म्हणून नोंदवली गेली. 2021 पासून त्यात सातत्याने वाढ होत आहे. हे चिंतेचे कारण आहे. नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांतील हवेच्या गुणवत्तेचे विश्लेषण पाहिल्यास, देशातील चार प्रमुख शहरांमध्ये वायू प्रदूषण वाढले आहे, परंतु, लखनऊ आणि पाटणासारख्या राज्यांच्या राजधानीत ते कमी झाले आहे.

दरम्यान, दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि कोलकाता येथे पीएम 2.5 पातळी ऑक्टोबर 2023 मध्ये एक वर्षापूर्वीच्या तुलनेत जास्त असल्याचे आढळले होते, परंतु चेन्नईमध्ये ते 23 टक्क्यांहून अधिक घटले. 2019 ते 2023 दरम्यान आठ प्रमुख राज्यांच्या राजधान्यांमधील पीएम 2.5 चे विश्लेषण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, लखनौ आणि पाटणा यांचा समावेश आहे. (हेही वाचा - Mumbai High Court On Air Pollution: मुंबईतील वाढतं प्रदूषण अत्यंत चिंताजनक, सरकार याबाबत गंभीर आहे का? कोर्टाचा सवाल)

अहवालानुसार, लखनौ आणि पाटणामध्ये ऑक्टोबर पीएम 2.5 पातळी 2022 ते 2023 दरम्यान कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ते जास्त नोंदवले गेले. लखनौमध्ये 2019 ते 2020 दरम्यान पीएम 2.5 55.2 टक्क्यांनी वाढले. 2021 मध्ये त्यात 53.4 टक्क्यांनी घट झाली. 2022 मध्ये ते पुन्हा 6.2 टक्क्यांनी वाढले आणि 2023 मध्ये पुन्हा 0.9 टक्क्यांनी घसरले. याशिवाय, 2019 आणि 2020 दरम्यान पटनामध्ये PM 2.5 मध्ये 14 टक्के घट दिसून आली. 2021 मध्ये त्यात 36.7 टक्क्यांनी घट झाली. यानंतर 2022 मध्ये 47.7 टक्के वाढ नोंदवली गेली. त्यानंतर 2023 मध्ये त्यात 11.1 टक्क्यांनी घट झाली.

तथापी, बेंगळुरू आणि चेन्नईमध्ये ऑक्टोबर PM 2.5 पातळी 2022 आणि 2023 दरम्यान घसरली. 2019 ते 2020 दरम्यान बेंगळुरूमध्ये PM 2.5 72.1 टक्क्यांनी वाढले. 2021 मध्ये 5.8 टक्क्यांची थोडीशी घसरण झाली. 2022 मध्ये ते पुन्हा 29.6 टक्क्यांनी वाढले आणि 2023 मध्ये पुन्हा 11.6 टक्क्यांनी घसरले. त्याचप्रमाणे 2019 ते 2020 दरम्यान चेन्नईमध्ये PM 2.5 43.2 टक्क्यांनी वाढले आहे. 2021 मध्ये ते 27.8 टक्क्यांनी घसरले. 2022 मध्ये ते पुन्हा 61.6 टक्क्यांनी वाढले आणि 2023 मध्ये 23.7 टक्क्यांनी कमी झाले.

मुंबईतील प्रदुषणात वाढ -

अहवालानुसार, मुंबईत 2019 ते 2023 या काळात ऑक्टोबर पीएम 2.5 पातळी सतत वाढत गेली. हवेची गुणवत्ता खालावल्याचे हे लक्षण आहे. मुंबईतील प्रदूषण गेल्या महिन्यात ऑक्टोबरच्या तुलनेत 42 टक्क्यांनी वाढले होते. मागील वर्षांमध्ये, 2019 आणि 2020 (54.2 टक्के) दरम्यान पीएम 2.5 वाढले आणि 2021 (3 टक्के) आणि 2022 (0.9 टक्के) मध्ये किंचित घट झाली.

2022 च्या तुलनेत 2023 मध्ये हैदराबाद आणि कोलकाता येथे ऑक्टोबर PM 2.5 पातळी वाढल्याचे दिसून आले. हैदराबादमध्ये 2019 ते 2020 दरम्यान पीएम 2.5 59 टक्क्यांनी वाढले. 2021 मध्ये त्यात 2.9 टक्के घट झाली. 2022 मध्ये ते 29.1 टक्के कमी झाले, परंतु 2023 मध्ये ते पुन्हा 18.6 टक्के झाले. 2019 ते 2020 दरम्यान कोलकातामध्ये PM 2.5 ची संख्या 26.8 टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळून आले. 2021 मध्ये ते 51.7 टक्क्यांपर्यंत वाढले. 2022 मध्ये ते पुन्हा 33.1 टक्क्यांनी कमी झाले आणि 2023 मध्ये पुन्हा 40.2 टक्क्यांनी वाढले.