Air Pollution | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

Mumbai Air quality: मुंबईतील नागरिक सर्दी, खोकला आणि श्वसनविकारांसह डोळ्याच्या विकारांनी त्रस्त आहे. पाठिमागील काही दिवसांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता (Mumbai Air Pollution) पुन्हा एकदा घरलली आहे. मुंबईतील हवेचा निर्देशांक 300 वर पोहोचली आहे. मुंबईच्या तुलनेत नवी मुंबईची हवा अधिक खराब आहे. नवी मुंबईतील हवेचा निर्देशांक 342 इतका नोंदवला गेला आहे एकट्या मुंबई शहराचा एक्यूआय 303 इतक्या वाईट स्थितीत पोहोचला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे अवाहन अभ्यासक देता.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार मुंबईतील विविध भागांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक वेगवेगळ्या भागात वेगवेगळा नोंदवला आहे. संपूर्ण शहराचा एक्यूआय 303 इतका नोंदवला गेला तर बीकेसीचा एक्यूआय 307, चेंबुरचा 319 तर अंधेरीत 339 इतका नोंदवला गेला. (हेही वाचा, Air Pollution: स्त्री की पुरुष? वायू प्रदुषणाचा अधिक धोका कोणाला? काय म्हणतो अभ्यास? घ्या जाणून)

हवेची गुणवत्ता घसरली की, नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. हवेतील प्रदुषणामुळे नागरिकांनाक प्रामुख्याने सर्दी, खोकला, कफ आणि डोकेदुखी असे सर्वासाधारण त्रास सुरु होतात. त्यातही खराब हवेचे प्रमाण कायम राहिल्यास मग नागरिकांमध्ये श्वसनविकार मोठ्या प्रमाणावर डोके वर काढतो. प्रामुख्याने हवेतील खराब गुणवत्तेमुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना अधिक त्रास जाणवतो. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी. जर अधिक काळ घराबाहेर राहाणार असाल तर नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे डॉक्टर सांगतात.

वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होतो आहे. कधी स्वच्छ निरभ्र आकाश तर कधी अचानक ढगाळ वातावरण निर्माण होते. कधी धुकेही पाहायला मिळते. महत्त्वाचे म्हणजे मुंबईत मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरु आहेत. मग ते उभे राहणारे टॉवर असोत की मेट्रोची कामे असूदेत. या सर्वांमध्यून मोठ्या प्रमाणावर धूळ पाहायला मिळते. त्यातच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणांवर वाहनांची गर्दी हिसुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रदुषणाला हातभार लावते.