वायू प्रदुषण (Air Pollution) हा अलिकडील काळात एक परवलीचा शब्दच ठरतो आहे. अवघे जग वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदुषणामुळे हैराण आहे. त्यात वायू प्रदुषण काहीसे आघाडीवर आहे. वायू प्रदुषणाचा सृष्टीप्रमाणेच मानवावरही विपरीत परिणाम होतो. पण तुम्हला काय वाटते वायु प्रदुषणाचा अधिक धोका महिलांना असेल की पुरुषांना? (Woman or Man) असा कधी विचारच नव्हता ना केला? या बाबत नुकताच एक शोधनिबंध सादर (Research Paper) करण्यात आला. या शोधनिबंधातील माहिती बरेच काही सांगून जाते. जाणून घ्या सविस्तर.
बार्सिलोना, स्पेनमधील युरोपियन रेस्पिरेटरी सोसायटी इंटरनॅशनल काँग्रेसमध्ये एक शोधनिबंध सादर झाला. या शोधनिबंधानुसार वायूप्रदुषणाचाधोका पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक असतो. होय, श्वासोच्छवासातील डिझेल एक्झॉस्ट धुराचा परिणाम पुरुषांपेक्षा स्त्रियांसाठी अधिक गंभीर असू शकतो. संशोधकांनी एक्झॉस्ट धुरामुळे लोकांच्या रक्तात होणारे बदल शोधले. संशोधकांना स्त्रिया आणि पुरुष यांच्यात जळजळ, संसर्ग आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांशी संबंधित रक्ताच्या घटकांमध्ये बदल आढळले. उल्लेखनीय असे की, त्यांना पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हे बदल अधिक आढळले. (हेही वाचा, महाराष्ट्रातील 97.6% लोकसंख्या धोकादायक किंवा असुरक्षित वायू प्रदूषणाच्या संपर्कात)
कॅनडातील विनिपेग येथील विनिपेग विद्यापीठातील संशोधक डॉ. हेमशेखर महादेवप्पा यांनी हा शोधनिबंध सादर केला होता. या संशोधनासाठी त्यांना मॅनिटोबा विद्यापीठातील प्राध्यापक नीलोफर मुखर्जी आणि ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठ, व्हँकुव्हर, कॅनडातील प्राध्यापक ख्रिस कार्लस्टन यांच्या नेतृत्वाखालील दोन संशोधन गटांचे सहकार्य होते. डॉ महादेवप्पा यांनी शोधनिबंधात म्हटले की, फ्फुसाच्या आजारांमध्ये (जसे की दमा आणि श्वसन संक्रमणांमध्ये) लैंगिक फरक आहेत. आमच्या संशोधनात असे दिसून आले आहे की श्वासोच्छवासावेळी डिझेल एक्झॉस्टमुळे फुफ्फुसांमध्ये जळजळ होते आणि शरीरावर श्वसन संक्रमणाचा परिणाम होतो. या संशोदनात आम्हालात असे शोधायचे होते की, प्रदुषणामुळे स्त्री आणि पुरुषांवर होणारे परिणाम किती आणि कसे वेगळे आहेत.
डॉ. महादेवप्पा यांनी सांगितले की, अभ्यासात दहा स्वयंसेवकांचा समावेश होता.
ज्यात पाच महिला आणि पाच पुरुषांचा समावेश होता. हे सर्वजण निरोगी धूम्रपान न करणारे होते. प्रत्येक स्वयंसेवकाने चार तास फिल्टर केलेली हवा आणि चार तास डिझेल एक्झॉस्ट धूर असलेली हवा श्वासनादरम्यान घेतली. या वेळी आम्हाला जाणवले की, वायुप्रदुषणामुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांवर अधिक दुष्परीणाम होतात.