Crude Oil (Photo Credits: PTI)

Crude Oil Price Update: भारतासाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. कच्च्या तेलाची किंमत (Crude Oil Price) नीचांकी पातळीवर गेली आहे. जागतिक आर्थिक संकटाच्या (Global Economic Crisis) पार्श्वभूमीवर, ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल $80 च्या खाली गेली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलची प्रति बॅरल $78.65 वर व्यापार करत आहे. त्यामुळे WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $73.49 पर्यंत घसरली आहे.

कच्चे तेल $80 च्या खाली घसरले -

2022 मध्ये ही दुसरी वेळ आहे जेव्हा ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल $80 च्या खाली घसरले आहे. फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आणि मंदीची शक्यता यामुळे कच्च्या तेलात मोठी घट झाली आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकांच्या कठोर आर्थिक धोरणाचाही परिणाम होतो. भारतात महागाई वाढल्यामुळे आरबीआयने पाचव्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. दुसरीकडे, चीनमधील सेवा-क्षेत्रातील क्रियाकलाप 6 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे. त्यामुळे ऊर्जेच्या चढ्या किमती आणि जास्त कर्ज यामुळे युरोपीय देशांच्या आर्थिक विकास दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. या सर्व कारणांमुळे कच्च्या तेलावर दबाव आहे. चालू वर्षात रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 139 डॉलरवर पोहोचला होता. म्हणजे किमती त्यांच्या उच्चांकावरून $61 प्रति बॅरलपर्यंत खाली आल्या आहेत. (हेही वाचा -Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल दर दररोज घ्या जाणून फक्त एका SMS च्या माध्यमातून)

दरम्यान, कच्च्या तेलाची घसरण भारतासाठी शुभ चिन्ह आहे. कारण, भारत आपल्या कच्च्या तेलाच्या वापरापैकी 80 टक्के आयात करतो. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याने महागाई कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर केंद्र सरकारची आर्थिक तूट कमी करण्यासाठी मदत मिळणार आहे. यामुळे परकीय चलन निधीतील घसरणही रोखता येईल.

पेट्रोल डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता -

कच्च्या तेलाच्या किमती घसरल्याचा मोठा फायदा ग्राहकांना मिळू शकतो. सरकारी तेल कंपन्या येत्या काही दिवसांत पेट्रोल डिझेलचे दर कमी करू शकतात. डिझेलची किंमत कमी झाल्यास मालवाहतूक स्वस्त होईल, त्यामुळे अनेक वस्तूंच्या किमतीवर त्याचा परिणाम दिसून येईल.