Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल दर दररोज घ्या जाणून फक्त एका SMS च्या माध्यमातून
दररोज नवनव्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या किंवा दररोज आपल्या वाहनात इंधन भरणाऱ्या व्यक्तीसाठी बदलते इंधन दर माहीत असणे महत्वाचे ठरते. दररोज बदलणारे हे इंधन दर तुम्ही केवळ एका SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. कसे ते घ्या जाणून.
पेट्रोल आणि डिझेल (Petrol-Diesel Price) म्हणजे सर्वसामान्य नागरिक ते उद्योगपती यांच्यापर्यंत थेट संबंधीत घटक. त्यामुळे देशभरातील जवळपास प्रत्येक घटकाचे लक्ष या दरवाढ आणि कपतीकडे लागलेले असते. देशभरात विकले जाणारे इंधन जवळपास सारख्याच गुणवत्तेचे असले तरी प्रत्येक शहरात त्याचे दर (Petrol-Diesel Price) वेगवेगळे असतात. कारण प्रत्येक शहरानुसार बदलणारे कर त्यात अंतर्भूत असतात. आशा वेळी दररोज नवनव्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या किंवा दररोज आपल्या वाहनात इंधन भरणाऱ्या व्यक्तीसाठी बदलते इंधन दर माहीत असणे महत्वाचे ठरते. दररोज बदलणारे हे इंधन दर तुम्ही केवळ एका SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. कसे ते घ्या जाणून.
देशातील प्रत्येक पेट्रल पंपावर दररोज सकाळी 6 वाजता नवे दर लागू होतात. कारण प्रत्येक ठिकाणचे स्थानिक महसूली कर वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यात अनेकदा पेट्रोल डिझेल तर वेगवेगळे असू शकतात. आपण पेट्रोल-डिझेलचे आपल्या प्रदेशातील दर SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला इंडियन ऑयल SMS सेवेच्या माध्यमातून मोबाइल नंबर 9224992249 वर SMS पाठवू शकता. त्यासाठी आपला मेसेज असा लिहायला हवा. RSP<स्पेस>पेट्रोल पंप डीलर कोड. आपल्या परिसरातील RSP साईटवर जाऊन तपासू शकता. हा मेसेज पाठवल्यानंतर काही सेकंदात आपल्या फोनवर ताजे पेट्रोल, डिझेल दर उपलब्ध होऊ शकतात.
पेट्रोल, डिझेल दारावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नेहमीच सामना रंगलेला पाहायला मिळतो. पेट्रोल डिझेल दर आणि महागाई यांचा अत्यंत घनिष्ट संबंध असतो. त्यामुळे विरोधक महागाईच्या मुद्यावरून सरकारला घेरतात. प्रमाणाबाहेर टीका होऊ नये यासाठी सत्ताधारी कायम सावध असलेले पहायला मिळतात. या सगळ्यात सर्वसामान्य जनतेची अपेक्षा इतकीच की काहीही करा परंतु इंधन दर मर्यादित ठेवा. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी म्हटले की इंधन दर कमी करण्याचे सध्या कोणताही विचार नाही. काँग्रेसच्या धोरणामुळे हे दर वाढत असल्याचे सीतारामन यांचे म्हणणे आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 20, 2021 04:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

