कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मृत्यूंच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहेत. अगदी जागतिक आरोग्य संघटनेनेही कोरोनाला महामारी म्हणून घोषित केले आहे. तसेच ही जगासाठी आरोग्यविषय आणीबाणी असल्याचे स्पष्ट केले आहे. या महाभयंकर जगव्यापी संकटाशी मुकाबला करण्यासाठी प्रत्येकाने एकमेकांना साथ देण्याची गरज आहे, असे आवाहन पतंप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सर्वांनाच केले आहे. नरेंद्र मोदीच्या आवाहनानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी मोदी सरकारला उद्देशून पत्र लिहले आहे. तसेच कोरोना विषाणूशी लढण्यासाठी सोनिया गांधील पत्राच्या माध्यमातून काही उपाय सुचवले आहेत. या मुद्यांचा विचार केला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोरोना विषाणू संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. यातच सोनिया गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, खासदारांच्या 30 टक्के वेतन कपातीच्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. कोविड-19 या महामारीच्या विरोधात लढण्यासाठी फार मोठा निधी उभा करणे, ही काळाची गरज आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. तसेच यासंदर्भातच मी 5 प्रस्ताव देत आहे. या मुद्यांचा विचार केला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: भारताने सर्व राष्ट्रांना मदत करावी, मात्र प्राण वाचवणारी औषधे प्रथम भारतीयांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावीत; राहुल गांधी
सोनिया गांधी यांनी सुचवलेले मुद्दे-
-केंद्र सरकार सरकारी जाहिरातींवर दरवर्षी 1 हजार 250 कोटी रुपये खर्च करते. याशिवाय, सरकारी उपक्रम व सरकारी कंपन्यांच्या जाहिरातींवरही मोठा खर्च होत असतो. हा सर्व खर्च टाळला तर यातून मोठा निधी कोरोनाविरोधात लढण्यासाठी तसेच समाजाच्या मदतीसाठी उपयोगी ठरेल. टीव्ही, वर्तमानपत्र व विविध ऑनलाईन जाहिराती 2 वर्षे बंद करुन त्यातून वाचणारा पैसा हा कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी उपयोगात आणावा. यातून कोरोनासंदर्भात जनजागृती करणाऱ्या जाहिराती मात्र वगळण्यात यावेत असे या पत्रात लिहण्यात आले आहेत.
-पुनर्विकास व सुशोभिकरणासाठी 20 हजार कोटी रुपये खर्च केला जात आहे. सध्याची परिस्थीती पाहता एवढा मोठा खर्च करणे अयोग्य असून या कामाला स्थगिती देण्यात यावी. मला विश्वास आहे की, सध्याच्या इमारतीतूनच संसद आपले संपूर्ण कामकाज करू शकते. आजच्या आपत्कालीन परिस्थितीत नवीन संसद व त्याची नवीन कार्यालये बांधण्याची गरज नाही. अशा संकटाच्या वेळी हा खर्च टाळता येऊ शकतो. या पैशांचा उपयोग नवीन रुग्णालये आणि वैद्यकीय संरक्षण उपकरणे देण्यासाठी तसेच आरोग्य कर्मचार्यांना अधिक चांगल्या सुविधांसाठी करणे आवश्यक आहे.
-भारत सरकारच्या खर्चाच्या अर्थसंकल्पात समान प्रमाणात 30 टक्के कपात केली जावी. ही 30 टक्के रक्कम ही स्थलांतरित कामगार, कामगार, शेतकरी, हातावरचे पोट असलेले मजूर आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या मदतीसाठी वापरली जावी.
-राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, विविध राज्याचे मुख्यमंत्री तसेच अधिकारी यांचे विदेश दौरे थांबवावे. दौरे थांबल्याने प्रवासखर्चाची जी बचत होईल, ती रक्कम कोरोनाविरोधातील लढाईसाठी वापरली जावी. फक्त पंतप्रधान आणि थांबले तरी 393 कोटी रुपयाची बचत होऊ शकते.
-पंतप्रधान सुरक्षा निधी फंडात जी रक्कम जमा झाली आहे, ती पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये वर्ग करण्यात यावी.
ट्वीट-
कांग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को COVID-19 महामारी से लड़ने के लिए कई उपाय सुझाए। इन उपायों में मुख्य रूप से खर्चों में कटौती कर कोरोना से निपटने में उपयोग किये जाने का सुझाव दिया। pic.twitter.com/MvHDxlIbSj
— Congress (@INCIndia) April 7, 2020
दरम्यान, देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 4421 वर पोहचली आहे. यातील 3981 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच 326 जणांना उपचार देऊन डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत देशात 114 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केवळ महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 891 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 41 रुग्णांची कोरोनाच्या जाळ्यातून सुटका झाली आहे.