राहुल गांधी | (Photo Credit: IANS)

Coronavirus: मैत्री ही सूड उगारण्यासाठी नाही. भारताने सर्व राष्ट्रांना त्यांच्या आवश्यक वेळी मदत केलीचं पाहिजे. परंतु प्राण वाचवणारी औषधे प्रथम भारतीयांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन द्यावीत, असं मत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्यक्त केलं आहे.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन (hydroxychloroquine) औषधाची मागणी केली आहे. तसेच भारताने या औषधाच्या निर्यातीवरील बंदी न उठवल्यास अमेरिका या विरोधात कारवाई करेल, असे संकेतही भारताला देण्यात आले आहेत. ट्रम्प यांनी मोदींसोबत औषधांच्या निर्यातीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. (हेही वाचा - Coronavirus: इंग्लंडचे पंतप्रधान Boris Johnson यांनाही कोरोना व्हायरस लागण, अतिदक्षता विभागात उपचार सुरु; परराष्ट्र मंत्री डोमिनिक सांभाळतातय कारभाराची सूत्रं)

सध्या भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे भारतालादेखील कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधांची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे भारताने इतर देशांना या औषधांचा पुरवठा करण्याअगोदर देशातील रुग्णांसाठी ही पुरेशी औषधं आहेत का? याचा विचार करावा. त्यानंतर इतर देशाची मदत करवी, असं मत राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला औषधं देण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. 'जर भारताने हे औषध अमेरिकेला दिलं तर मला त्यात काही आश्चर्य वाटणार नाही. कारण आमचं त्यावर बोलणं झालं. आम्ही त्यांचं कौतुकच करू. पण जर तरीही त्यांनी हे औषध अमेरिकेला दिलं नाही तर निश्चित आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ आणि प्रत्युत्तर का दिलं जाऊ नये?', असा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिला आहे. त्यामुळे भारत अमेरिकेला हाइड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.