इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉनसन (British PM Boris Johnson) यांनाही कोरोना व्हायरस (Coronavirus0 संक्रमन झाले आहे. त्यांची प्रक्रृती बिघडल्याने त्यांना लंडन येथील सेंट थॉमस रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. यूके मीडियाने भारतीय प्रमाण वेळेनुसार सोमवार-मंगळवार मध्यरात्री हे वृत्त दिले आहे. वृत्तसंस्था एएफपीने वृत्त दिले आहे की, जॉनसन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर परराष्ट्र मंत्री डोमिनिक राब यांनी तात्पुरत्या स्वरुपात कारभार हातात घेतला आहे.
दरम्यान, इंग्लंडच्या सरकारने सोमवारी (6 एप्रिल) म्हटले होते की, पंतप्रधान बोरिस जॉनसन हे कोविड-19 संबंधी नियमीत तपासणीसाठी रुग्णालयात रात्रभर राहिल्यानंतर आता त्यांना बरे वाटत आहे. इंग्लंडचे गृह आणि सामाजिक प्रकरणांचे मंत्री रॉबर्ट जेनेरिक यांनी म्हटले आहे की, जॉनसन हे जागतिक महामारी (साथ) विरुद्ध इंग्लडमधील जबाबदारी पार पाडत आहेत. उपचारानंतर लवकरच त्यांची 10 डाऊनिंग स्ट्रीटमध्ये वापसी होईल. कॅबिनेट मंत्र्यांनी बीबीसी सोबत बोलताना सोमवारी सकाळी सांगितले की, 'त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले नाही. त्यांची नियमीत तपासणी होईल हे आगोदरच ठरले होते. मला मिळालेली माहिती अशी आहे की, त्यांची प्रकृति चांगली आहे आम्हाला अपेक्षा आहेत की, ते लवकरच डाऊनिंग स्ट्रीय 10 येथे परततील. '
एएफपी ट्विट
BREAKING# UK foreign minister Dominic Raab to deputise for ill PM Johnson: office pic.twitter.com/nnhDuVOFBp
— AFP news agency (@AFP) April 6, 2020
पंतप्रधान जॉनसन बोरिस यांच्या आरोग्य संदर्भातील अपडेट रविवार (5 एप्रिल) सायंकाळी त्यांच्या नॅशनल हेलथ सर्विस (एनएचएस) मध्ये भर्ती झाल्यानंतर आले होते.कोरोना व्हायरस संक्रमीत झाल्यानंतर 10 दिवसांनंतर त्यांच्या संक्रमण आणि लक्षणं पाहून त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 'डाउनिंग स्ट्रीट' प्रवक्त्यांनी रविवारी सांगितले की, 55 वर्षीय जॉनसन यांच्यात 'कोरोना व्हायरस लक्षण अद्यापही दिसत आहेत.' जॉनसन यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा, चीन ने पाकिस्तानला मदतीच्या नावावर दिला धोका? COVID 19 चे संकट असताना N95 च्या ऐवजी पाठवून दिले Underwear Mask, वाचा सविस्तर)
इंग्लंड सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, पंतप्रधानांना डॉक्टरांच्या सल्ल्यावरुन रुग्णालयात आज रात्री दाखल करण्या आले. हे एक महत्त्वाचे पाऊल होते. कारण की, पंतप्रधानांना कोरोना सक्रमनाची पुष्टी झाल्यानंतर 10 दिवसांनंतरही त्यांच्यात कोरोनाची लक्षणं आढळून आली होती. त्यांनी म्हटले की, पंतप्रधानांनी एनएचएस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. आणि लोकांनी घरात रहावे या सरकारचे पालन करावे, असे सांगितले.