पाकिस्तानला (Pakistan) कोरोनाचा मोठा फटका बसला असताना अलीकडेच मित्र देश चीन (China) ने स्वतःहून मदतीचा हात पुढे केला होता. चांगल्या दर्जाचे N95 मास्क पाकिस्तानला पाठवणार असल्याचे आश्वासन चीन कडून देण्यात आले होते. साहजिकच यावरून इमरान खान यांचे सरकार चीनवर खुश होते. मात्र आता समोर येणाऱ्या माहितीनुसार चीनने N95 मास्क ऐवजी अतिशय निकृष्ट दर्जाचे अंडरवेअर पासून बनवलेले मास्क पाकिस्तानला धाडून दिले आहेत असे समजतेय. प्राप्त माहिती नुसार, गिलगिट- बलुचिस्तान ची सीमा उघडण्याच्या बदलात चीन कडून पाकिस्तानला वैद्यकीय मदत पुरवण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र त्याऐवजी अंतर्वस्त्रांचे मास्क बनवून पाठवल्याने आता चीन वरील विश्वास फोल ठरल्याचे पाकिस्तान कडुन म्ह्ंंटले जात आहे. यापुर्वी सुद्धा काही युरोपीय देशांनी चीन कडुन येणारे वैदकीय सामान निकृष्ट दर्जाचे असल्याचे सांगण्यात आले होते,यावरुनच स्पेन (Spain) आणि नेदरलॅंंड (Neatherland) कडुन चीन ची मदत घेण्यास नकार देण्यात आला होता.
निवृत्त मेजर गौरव आर्य यांनी ट्विट करून माहिती देत, चीनने आम्हाला चांगल्या दर्जाचे N95 मास्क पुरवू असं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांनी पाठवलेले मास्क आले तेव्हा ते अंडरविअरपासून तयार करण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे मास्क होते असं समोर आल्याचे सांगितले आहे. परिणामी जागतिक संकटकाळात पाकिस्तानला चीनने फसवले किंबहुना चीनने चुना लावला अशी भावना सध्या पाकिस्तान कडून व्यक्त केली जात आहे. पाकिस्तान: लॉक डाऊन दरम्यान नमाज पठणासाठी एकत्र जमण्यास नाकारल्याने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक; 7 जणांना अटक (Watch Video)
पहा ट्विट
China promised to send top quality N-95 masks to Pakistan. When the consignment landed, Pakistanis found that China had sent masks made of underwear.
Pakistani anchor says “China ne Choona laga diya”. #ChineseVirusCorona pic.twitter.com/3H4Uo151ZJ
— Major Gaurav Arya (Retd) (@majorgauravarya) April 4, 2020
दरम्यान, पाकिस्तान मध्ये सिंध प्रांतात 839 , खैबरमध्ये 343 , बलुचिस्तानात 175 तर गिलगिटमध्ये 193 करोना रुग्ण सापडले आहेत. शुक्रवारपर्यंत पाकिस्तानात सापडलेल्या रुग्णांची संख्या 2700 च्या वर गेली आहे. तर आत्तापर्यंत 40 जणांचा करोनाची बाधा झाल्याने मृत्यू झाला आहे. यावर उपाय म्हणून पाकिस्तान मध्ये सुद्धा लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे.