Bihar Shocker: बॅंक व्यवस्थापकाचे पोटच्या मुलीवर 3 वर्ष लैंगिक अत्याचार, पत्नीच्या तक्रारीनंतर अटक
Rape Case | (Photo credit: archived, edited, representative image)

देशात महिला अत्याचार आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे सुरुच आहे. देशातील विविध कोपऱ्यात दररोज हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना घडत आहेत. यातच बिहारच्या (Bihar) मोतिहारी (Motihari) येथून बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या परिसरात पोटच्या मुलीवर गेल्या 3 वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पीडिताच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

आरोपी एका बॅंकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. आरोपीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा पती गेल्या तीन वर्षांपासून मुलीसोबत हे घृणास्पद कृत्य करत होता. आरोपी हा दारूच्या नशेत आल्यावर पीडिताशी गैरवर्तन करायचा. पीडित मुलीच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिने अनेक वेळाआरोपीला विरोध केला. परंतु, आरोपीने तिला तोंड गप्प ठेवण्यास सांगितले. तसेच याबाबत बाहेर कुठे वाच्यता केल्यास ठार मारेल, अशी धमकीही दिली होती. या भितीपोटी संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. हे देखील वाचा- Bihar Shocker: पतीने 500 रुपये 'हफ्ता' देण्यास दिला नकार; दोन पुरुषांनी केला त्याच्या पत्नीवर सामुहिक बलात्कार

याआधीही आरोपीने त्याच्या महिला सहकाऱ्यासोबत अश्लील कृत्य केले होते. मात्र, ते प्रकरण टळले होते. तसेच आरोपीने गपचूप दुसरे लग्नदेखील केले असल्याचे फिर्यादी महिलेने म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसचे पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर, चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा कबूल केल्याचे मोतिहारी जिल्ह्याचे डीएसपी राम नरेश पासवान यांनी म्हटले आहे.