मुंबईमधील साकीनाका येथे घडलेला बलात्कार (Rape) आणि हत्या प्रकरणाबाबत राज्यात संतापाची लाट पसरली आहे. इतर ठिकाणाहून समोर येणाऱ्या बलात्काराच्या घटना जनतेमधील रोष अजून वाढवत आहेत. बिहारच्या (Bihar) भागलपूरमध्ये (Bhagalpur) खून, दरोडा आणि बलात्कार यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेबाबत प्रशासनावर टीका होत आहे. आता भागलपूर जिल्ह्यात पतीसमोर महिलेवर सामुहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी रात्री विद्यापीठ पोलीस ठाणे क्षेत्राअंतर्गत पावटी येथील गोभीबारी येथे घडली. कन्हैया यादव आणि सावन यादव अशी आरोपींची नावे आहेत.
या महिलेच्या पतीने 500 रुपये 'हफ्ता' देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कन्हैया आणि सावनने बलात्कार पीडितेच्या पतीला एका निर्जन ठिकाणी नेले आणि त्याच्याकडे दारू आणि जेवणासाठी 500 रुपयांची मागणी केली. जेव्हा त्या व्यक्तीने त्यांना पैसे देण्यास नकार दिला, तेव्हा त्यांनी त्याला मारहाणही केली. त्यानंतर सावन त्या माणसाच्या घरी गेला आणि त्याच्या पत्नीला कन्हैयाकडे येऊन माफी मागण्यास सांगितले, अन्यथा पतीला मारण्याची धमकी दिली.
जेव्हा महिला घटनास्थळी पोहचली तेव्हा तिचा पती घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर कन्हैयाने पिस्तुलाने हवेत गोळीबार करून महिलेला धमकावले. नंतर त्याने व सावनने तिच्यावर कथितरीत्या सामूहिक बलात्कार केला. कशीबशी ही महिला तिथून पळून गेली आणि जवळच्या घरात आश्रय घेतला. त्यानंतर परिसरातील लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
(हेही वाचा: Noida: महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याप्रकरणी 4 जणांना अटक, उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील घटना)
आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपींना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. दोन्ही आरोपींचा पूर्वीचा गुन्हेगारी रेकॉर्डदेखील तपासला जात आहे.