Noida: महिला पत्रकाराचा विनयभंग केल्याप्रकरणी 4 जणांना अटक, उत्तर प्रदेशच्या नोएडा येथील घटना
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

देशात महिला अत्याचार रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असताना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) नोएडा (Noida) येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शहरातील सेक्टर-18 येथे एका महिला पत्रकाराशी छेडछाड (Molestation) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. संबंधित महिला पत्रकार 11 सप्टेंबर रोजी पावसाच्या संबंधित बातमी करण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपींनी तिच्याशी अश्लील कृत्य आणि शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

पोलीस स्टेशन सेक्टर -20 चे प्रभारी निरीक्षक मुनीश प्रताप यांनी दिलेल्या माहिती "एका वृत्तवाहिनीची महिला पत्रकार 11 सप्टेंबर रोजी पावसाच्या संबंधित बातमी करण्यासाठी सेक्टर-18 मध्ये गेली होती. त्यावेळी आरोपी जयप्रकाश, आशिष, हितेश आणि वंचित या चार जणांनी तिच्याशी छेडछाड केले. त्यावेळी महिला पत्रकाराने विरोध केला असता आरोपींनी तिला शिवीगाळ आणि जीवेमारण्याची धमकी दिली. याप्रकरणी महिला पत्रकारांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली आहे." हे देखील वाचा- Uttar Pradesh: अल्पवयीन विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर केक लावल्याप्रकरणी शिक्षकाला अटक

दरम्यान, लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होऊ लागले असताना देशात महिला अत्याचार आणि विनयभंगाच्या घटनेत वाढ पाहायला मिळत आहे. याप्रकरणातील दोषी आढळलेल्या आरोपींना तरुंगात पाठवण्यात आले आहे. यातच नोएडा येथे एका महिला पत्रकारासोबत घडलेल्या प्रकारानंतर महिला सुरक्षतेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.