Uttar Pradesh: अल्पवयीन विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर केक लावल्याप्रकरणी शिक्षकाला अटक
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

एका अल्पवयीन विद्याथीनीच्या (Minor Student) चेहऱ्यावर जबरदस्तीने केक (Cake) लावल्याप्रकरणी 57 वर्षीय शिक्षकाला (Teacher) अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांना तरूंगात पाठवण्यात आले आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) रामपूर (Rampur) परिसरात घडली आहे. याप्रकरणातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पीडिताच्या वडिलांनी स्थानिक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर आऱोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीवर लैंगिक अपराध प्रतिबंधक कायदा कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत आरोपी पीडित मुलीच्या चेहऱ्यावर जबरदस्तीने केक लावत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत आरोपी शिक्षक पीडिताला तुला कोण वाचवायला येणार? असे बोलत असल्याचे ऐकू येत आहे. मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आणि सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. शाळा व्यवस्थापनाने शिक्षकाला निलंबितही केले आहे. हे देखील वाचा- Bangalore Murder Case: रागाच्या भरात बापानेच केली पोटच्या मुलाची हत्या, या प्रकरणी 3 जण अटकेत

रामपूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक संसार सिंह म्हणाले, "ही घटना शिक्षक दिनानिमित्त (5 सप्टेंबर) घडली. हा कार्यक्रम सिव्हिल लाइन्स परिसरात आरोपी शिक्षक आलोक सक्सेना द्वारा आयोजित कोचिंग सेंटरमध्ये साजरा केला जात होता. याप्रकरणातील आरोपी शिक्षकाला न्यायालयात हजर केले आणि शनिवारी तुरुंगात पाठवले. दरम्यान,"ही घटना शाळेच्या परिसरात घडली नाही, परंतु आम्ही व्हिडिओ आणि आवश्यक कारवाईची दखल घेतली आहे", असे पीडिताच्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणाले आहेत.