US Shocker : 8वीच्या वर्गातील विद्यार्थ्यावर शिक्षिकेकडून लैंगिक अत्यचार; तक्रार दाखल होताच दिली कबूली
Jail Pixabay

US Shocker : मिशेल क्रिस्टीन सॉलिस असे 46 वर्षीय आरोपी माजी शिक्षीकेचे ( Former Teacher)नाव आहे. ग्रिडली शाळेत ती शिक्षिका म्हणून काम करत होती. तिने तिचा विद्यार्थी (Student) असलेल्या 14 वर्षीय विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण केल्याची कबूली दिली आहे. सॉलिसने अल्पवयीन विद्यार्थ्याला स्वतःची अश्लील फोटो पाठवले होते. 2021 मधील ही घटना असून शिक्षीकेला आता शिक्षीकेने आता गुन्ह्याची कबूली दिली आहे. सायकमोर ज्युनियर हायस्कूलमधील विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप सॉलिसवर करण्यात आला होता. मात्र, अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप फेटाळला आहे. (हेही वाचा :Spain : व्हेंडिंग मशीनच्या कॉफीमध्ये आढळले कीटक; महिला प्रवाशाचा खोडक्यात वाचला जीव, पाल्मा विमानतळावरील घटना )