
Spain : पाल्मामध्ये मेजोर्का येथील विमानतळावरील वेंडिंग मशीनमधून विकत घेतलेल्या कॉफी (Coffee)मध्ये कीटक (Insect ) सापडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ती कॉफी पिल्याने एका 21 वर्षीय तरूणीवर विपरीत परिणाम झाला. ज्यामुळे तरूणीला थेट आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून पोलिस घटनेचा तपास करत आहेत. (हेही वाचा :Pakistan Shocker: प्रेयसीच्या बर्गरचा एक तुकडा खाल्ला, प्रियकराने केली मित्राची हत्या; कराचीमधील घटना )
पाल्माजवळील सोन सांत जोन विमानतळावर 22 एप्रिल रोजी ही घटना घडली. व्हेंडिंग मशिनची कॉफी तरूणीने विकत घेतली. त्यानंतर तिने कॉफीचा एक सीप घेताच तिला कॉफीची चव प्रचंड कडू लागली. त्यानंतर तिने कॉफी मग पाहिला असता. तिला मगमध्ये मेलेल्या किटकांचा थर दिसला. त्यावर तरूणी घाबरली. तिची प्रकृती खालावली. ज्यामुळे तरूणीचा चेहरा सुजला, तिचा घसा बंद झाला, रक्तदाब वाढला आणि श्वास घेण्यात अडचणी येऊ लागल्या. त्यानंतर जवळपास असलेल्या नागरिकांनी तिला रूग्णालयात दाखल केले. या परिस्थीतीला ॲनाफिलेक्टिक शॉक असे म्हणतात. ज्यात तीव्र ऍलर्जी निर्माण होते. त्वरित उपचार न केल्यास प्राणघातक ठरू शकते. (हेही वाचा :TikTok Ban: सायबर सुरक्षा, गोपनीय माहितीच्या गैरवापरामुळे टिकटॉक ॲपवर अनेक देशात बंदी; भारतास १७ देशाचा समावेश )
24 एप्रिलला तरूणीला डिस्चार्ज देण्यात आला. 36 तास तरूणी अतिदक्षता विभागात होती. या घटनेनंतर तरूणीच्या कुटुंबियांनी विमानतळ प्रशासनाविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली आहे. वेंडिंग मशीनच्या देखभालीमध्ये निष्काळजीपणाचा आरोप तरूणीच्या कुटुंबियांनी केला आहे. कारवाईत वेंडिंग मशीन सेवेतून काढून टाकण्यात आले आहे.