Pakistan Shocker: प्रेयसीच्या बर्गरचा एक तुकडा खाल्ला, प्रियकराने केली मित्राची हत्या; कराचीमधील घटना
Gun Shot | Pixabay.com

Pakistan Shocker: कराची (Karachi)येथे एका तरुणाने आपल्या प्रेयसीसाठी मागवलेला बर्गर (Burger) खाल्ल्यामुळे मित्राची हत्या (Murder) केली आहे. त्याबबतची बातमी ARY न्यूजने दिली आहे. कराचीमधील डिफेन्स फेज 5 भागात काही दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. आता पोलिस अधिकारी निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, दानियाल असे आरोपीचे नाव आहे. त्याचे वडिल पोलीस अधीक्षक (एसएसपी) नजीर अहमद मीरबहार आहेत. त्याने एक दिवस त्याची प्रेयसी शाझिया हिला त्याच्या घरी बोलावले होते. त्यावेळी त्याने दोघांसाठी दोन बर्गर मागवले होते. त्याचा मित्र अली केरियो आणि त्याचा भाऊ अहमर हे देखील उपस्थित होते.

आरोपीने स्वतःसाठी आणि शाझियासाठी दोन बर्गर मागवले होते. तथापि, किरिओने दानियालच्या प्रेयसीच्या बर्गरचा एक भाग कथितपणे खाल्ल्याने वाद निर्माण झाला, ज्यामुळे दानियाल प्रचंड रागावला. त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाले. नंतर दानियालने किरिओवर गोळीबार केला. ज्यात तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात उपचार सुरू असताना किरिओचा मृत्यू झाला.

सखोल तपासाअंती तपास अधिकाऱ्यांनी चौकशी पूर्ण करून पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाला गुन्ह्यासाठी जबाबदार धरून अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केला. ARY न्यूजच्या वृत्तानुसार, आरोपी दानियाल नजीरला सध्या ताब्यात घेण्यात आले आहे, न्यायालयात खटला सुरू आहे.