वेतन श्रेणीत सुधारणा करण्यात याव्यात, यासाठी बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी संप पुकारला होता. दरम्यान, नागरिकांना बॅंए़के संबंधित कामात मोठा अडथळा निर्माण झाला होता. यातच बॅंक कर्मचारी पुन्हा संप पुकारण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती बॅंक एम्प्लॉई फेडरशन ऑफ इंडिया (BEFOI)आणि ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉई असोसिएशन (ABEA) यांनी दिली आहे. तसेच येत्या 11 मार्च ते 13 मार्च दरम्यान लागोपाठ 3 दिवस बॅंक कर्मचारी संपाची घोषणा करू शकतात, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
वेतन श्रेणीत वाढ करण्यात यावी, यासाठी बॅंक कर्मचारी संप पुकारत आहेत. बॅंक कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवण्याच्या मागणी संदर्भात इंडिया बॅंक असोसिएशन यांच्यात चर्चा झाली होती. मात्र, ही चर्चा अयशस्वी ठरल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बॅंक कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाण्याची शक्याता व्यक्त केली जात आहे. महत्वाचे म्हणजे, जर 11 मार्च ते 13 मार्च दरम्यान बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तर, नागरिकांना मोठी अडचण निर्माण होऊ शकते. कारण, 13 ते 15 मार्च या तारिख बुधवार, गुरूवार, शुक्रावारी आल्या आहेत. त्यानंतर 14 मार्च रोजी दुसरा शनिवार आणि 15 मार्च रोजी रविवारी आल्याने थेट 5 दिवस बॅंक बंद राहू शकते. हे देखील वाचा- RBI कडून रेपो रेटमध्ये बदल नाही, तर 2020-21 वर्षासाठी GDP 6 टक्के राहणार असल्याचा अनुमान
सरकारच्या धोरणांना विरोध करत 8 जानेवारीला बॅंक कर्मचारी संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले होते. सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास येत्या 1 एप्रिलपासून अनिश्चित काळासाठी संपावर जाऊ, अशा इशाराही त्यांनी दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बॅंक कर्मचाऱ्यांच्या पगारात 2012 साली वाढ करण्यात आली होती. मात्र, 2017 साली पगारात कोणतीही वाढ न झाल्याने बॅंक कर्मचाऱ्यांनी पुन्हा संप पुकारत आहेत. मात्र, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बॅंकेच्या कामाकाजावर याचा कोणताही प्रभाव पडणार नाही.
बॅंक एम्प्लॉई फेडरशन ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉई असोसिएशन यांनी केवळ शक्यता व्यक्त केली आहे. याची बॅंक कर्मचाऱ्यांची अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. जर बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तर, 11 मार्च ते 15 मार्च या कालावधीत नागरिकांना पैशांचे व्यवहार करताना अनेक समस्यांच्या सामोरे जावे लागणार आहे.