रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) यांच्या बैठकीत व्याज दराबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. MPC च्या सर्व सदस्यांनी व्याज दरात कोणताही बदल करु नये असे मत व्यक्त केले आहे. आरबीआयने सध्या सुरु असलेला रेपो रेट 5.15 टक्के कायम ठेवला आहे. तर रिवर्स रेपो रेट सुद्धा 4.90 टक्के ठेवला आहे. आरबीआयने CPR 4 टक्के आणि SLR 18.5 टक्केच ठेवण्यात आला आहे. बजेट सादर झाल्यानंतर आरबीआयने व्याज दराबाबत ही घोषणा केली आहे.रेपो रेट दलात बदल न केल्याने एफडी खातेधारकांवर सुद्धा परिणाम होणार आहे. तर सध्या व्याजदर 6.60 टक्के असून नोव्हेंबर 2019 मध्ये 6.75 टक्के होता. ऑगस्ट 2019 मध्ये सामान्य नागरिकांना एफडीवर 6.8 टक्के व्याजदर आणि वरिष्ठ नागरिकांसाठी 7.3 टक्के होता.
देशाचा विकास दर (GDP) 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 6 टक्के राहणार असल्याचा अनुमान लावण्यात आला आहे. पुढील आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यासाठी विकास दर 5.5 टक्क्यांवरुन 6 टक्के होईल अशी अपेक्षा आहे. तर तिसऱ्या तिमाहित विकासदर 6.2 टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे.(Government Job: केंद्र सरकारच्या विविध विभागात तब्बल 6.83 लाख पदे रिक्त, लवकरच होणार भरती- राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती)
Tweet:
Governor, Reserve Bank of India’s Press Conference https://t.co/7AvViXwLPl
— ReserveBankOfIndia (@RBI) February 6, 2020
अर्थसंकल्पाच्या दिवशी म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी बाजारातील भांडवल घसरून 1,53,04,724.97 कोटींवर आले. या अर्थाने, केवळ एका व्यावसायिक दिवसात गुंतवणूकदारांना 3.46 लाख कोटींपेक्षा जास्त तोटा झाला आहे. शनिवारी, अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्समध्ये 10 वर्षांतील सर्वात मोठी घसरण दिसून आली. व्यापार संपल्यानंतर सेन्सेक्स 987.96 अंक किंवा 2.43 टक्क्यांनी घसरून, 39,735.53 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे निफ्टी 300.25 अंक किंवा 2.51 टक्क्यांनी घसरून, 11,661.85 अंकांवर आला होता.