Surgical Strike (Photo Credits-Google Map)

पाकिस्तानने (Pakistan) उरी (Uri) सेक्टरमध्ये १८ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्कारावर (Indian Army) भ्याड हल्ला (Terrorists Attack) केला होता. या भ्याय हल्ल्यात भारतीय लष्करातील १९ सैनिक शहीद झाले होते. या नापाक कृत्याचे सूड घेण्यासाठी 3 वर्षांपूर्वी पाकव्यात काश्मीरमध्ये (Kashmir) भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राइक (Surgical Strike) केला होता. 29 सप्टेंबर 2016 ला सकाळी एलओसीवर (LOC) जाऊन लष्कराने दहशतवाद्यांचे लाँचपॅड उद्धवस्त केले होते. जगभरातून भारतीय लष्कराच्या या कारवाईचे कौतुक झाले होते. यावर घटनेवर अधारीत 'उरी द सर्जिकल स्ट्राईक' असा सिनेमा तयार करण्यात आला होता. भारतीय सैनिकांनी कशाप्रकारे पाकव्यात घुसून कारवाई केली होती, याचे चित्रीकरण या सिनेमातून करण्यात आले होते. या सिनेमाला अनेकांनी मोठी पसंती दर्शवली होती.

भारताने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने संपूर्ण परिसराला घेरले होते. सर्व मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून नेण्यात आले. जवळच्या गावांमध्ये हे सर्व मृतदेह दफन करण्यात आल्याचंही समोर आले होते. रात्री 2 वाजल्यापासून ते पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत म्हणजे 3 ते 4 तास हल्ला सुरू होता, असेही प्रत्यक्षदर्शीने सांगितले. पाकिस्तानने उरी सेक्टरमध्ये 18 सप्टेंबर 2016 भारतीय लष्करावर भ्याड हल्ला केला होता. भारतीय लष्कराकडून 11 दिवसांनंतरच सर्जिकल स्ट्राइक करण्यात आला होता. 29 सप्टेंबर 2016 ला भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सीमेत 3 किलोमीटर आतपर्यंत घुसून सर्जिकल स्ट्राइक केले होते. हे देखील वाचा-IAF एअर स्ट्राईकमध्ये 250 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा- अमित शाह

सौ. युट्यूब-

 

सीमेजवळच्या गावातील भारतीय नागरिकांचे काही नातेवाईक पाकव्याप्त काश्मीरमध्ये राहतात. नियंत्रण रेषेपासून 4 किमी अंतरावरील दुधनियाल या खेडेगावातील मुख्य बाजारातून 2 प्रत्यक्षदर्शींनी काही इमारती आगीत भस्मसात झाल्याचे पाहिले गेले. येथील अलहवाई ब्रिज शेवटचे ठिकाण आहे, जिथे दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यापूर्वी सर्व साहित्य पुरवले जातात.

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?

सर्जिकल स्ट्राईक ही युद्धशास्त्रातील एक संज्ञा आहे. थोडक्यात सर्जिकल स्ट्राईक म्हणजे अतिशय नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाईच असते. सोप्या भाषेत घुसून मारणे असे म्हणता येईल. सर्जिकल स्ट्राईकमध्ये मोठे नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याला अपेक्षित ठिकाणावरच हल्ला करणे, म्हणजे सर्जिकल स्ट्राईक होय. साधरणपणे विमानांद्वारे करण्यात येणाऱ्या बॉम्ब हल्ल्यात आपल्याला अपेक्षित ठिकाणीपेक्षा आजूबाजूच्या परिसराचीही मोठी हानी होते. परंतु यामध्ये लक्ष्य व्यतिरिक्त इतर कोणत्याही परिसरात हानी पोहचणार नाही, याची काळजी घेतली जाते.