IAF एअर स्ट्राईकमध्ये 250 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा- अमित शाह
BJP National President Amit Shah | (Photo courtesy: Facebook)

भारतीय वायुसेनाने (Indian Air Force) केलेल्या पाकिस्तान (Pakistan) मधील बालकोट (Balkot) येथे घुसुन हल्ला केल्यानंतर एअर स्ट्राईक (Air Strike) हे सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे या हवाई हल्ल्यात नेमक्या किती दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला याबाबत सर्वांना माहिती करुन घ्यायचे आहे.सोशल मीडिया ते वृत्तवाहिन्यांमध्ये एकूण किती दहशतवादी ठार झाल्याचे निश्चित होत नाही आहे. मात्र या सर्वामध्ये भाजप (BJP) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा (Amit Shah) यांनी दहशतवाद्यांच्या खात्माबाबत मोठे विधान केले आहे. अमित शहा यांनी दावा केला आहे की, वायुसेनेने हल्ला करत 250 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्याचसोबत विरोधी पक्षावर टीका करत शहा यांनी असे म्हटले की, ममता-राहुल गांधी यांनी हलक्यातील राजकरण करणे सोडून द्या.

गुजरात मधील अहमदाबाद येथील एका रॅलीमध्यील भाषणात अमित शहा यांनी असा दावा केला की, पुलवामा हल्ल्यानंतर सर्वांना वाटत होते एअर स्ट्राईक होणार नाही. परंतु काय झाले? पुलावामा दहशतवादी हल्ल्याच्या अवघ्या 13 दिवसानंतर मोदी सरकारच्या काळात केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये 250 दहशतवादी मारले गेले. (हेही वाचा-एअर स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्यांना नरेंद्र मोदी यांचे सडेतोड उत्तर; जवानांच्या पराक्रमावर शंका का उपस्थित केली जात आहे?)

तसेच विंग कमांडर अभिनंदन ह्याला पाकिस्तानने कैद केल्यावर सर्वजण दुख व्यक्त करु लागले होते. मात्र मोदी सरकारचा प्रभाव ऐवढा होता की, पाकिस्तानला अभिनंदन ह्याला सोडणे भाग असल्याचे शहा यांनी म्हटले आहे.

दरम्यान, 26 फेब्रुवारी रोजी वायुसेनेच्या मिराज-2000 या लढाऊ विमानांनी मुजफ्फराबाद, चकोटी आणि बालकोट येथील दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त करुन लावली. मीडिया रिपोर्टनुसार, वायुसेनेने केलेल्या हल्ल्यात काही दहशतवादी आणि ISI चे ऐजंट मारले गेले. त्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या विमानांनी भारताच्या सीमेवर घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कारवाईमध्ये मिग-21 ने पाकिस्तानचे एफ-16 विमानावर हल्ला केला होता.