'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये होणार नवीन दया भाभी ची एंट्री, दिशा वाखाणीची जागा घेणार ही अभिनेत्री!
दया भाभी भूमिका कोण साकारणार (Photo Credits: Youtube)

टीव्ही मालिकांच्या जगात मागील एका दशकापासून आपलं वर्चस्व टिकवून असलेल्या तारक मेहता का उल्टा चष्मा (Tarak Mehta Ka Ooltah Chashma) मालिकेचं क्रेझ आजही अबाधित आहे. मात्र मागील वर्षापासून मालिकेतील मुख्य पात्र दया भाभीची( Daya Bhabhi) एपिसोडस मधील अनुपस्थिती बघून चाहते निराशे होत असल्याचे समोर येत आहे.

ही भूमिका साकारणाऱ्या दिशा वाखाणिने (Disha Vakhani) गरोदर असल्याने 2017 पासून शूटिंगला सुट्टी घेतली होती. नोव्हेंबर मध्ये दिशाला कन्यारत्न प्राप्त झालं,त्यानंतर आता दया भाभी पुन्हा कार्यक्रमात कधी परततेय याकडे सर्वचं लक्ष लागून होत.

 

View this post on Instagram

 

#🙈💕

A post shared by Disha Vakani (@disha.vakani) on

मात्र याबद्दल मालिकेचे निर्माते आसित मोदी यांनी माहिती देत सांगितलं होतं की, कोणताही शो असाच मोठा होत नाही, दयाभाभी शिवाय मालिकेचं कुटुंब अपूर्ण आहे. देशात अनेक गरोदर महिला प्रेग्नन्सी साठी सुट्टी घेतात आणि नंतर पुन्हा कामावर रुजू देखील होतात असाच विचार करून आम्ही दिशाला सुट्टी दिली होती मात्र आता आम्ही कायमची तिची वाट बघत बसू शकत नाही. त्यामुळे आम्हाला एका नव्या चेहऱ्याचा शोध आहे.  सूत्रांच्या माहिती नुसार हा शोध आता 'पापडपोल' या सब टीव्हीवरील मालिकेतून सर्वांसमोर आलेल्या अमी त्रिवेदी (Ami Trivedi) च्या नावावर येऊन थांबलाय. 'तारक मेहता...' मध्ये लवकरच परतणार दयाबेन ; पण आहेत 'या' अटी

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सूत्रांच्या माहितीनुसार निर्मात्यांनी दिशा वाखाणिच्या जागी अमी त्रिवेदीला मालिकेत घेण्याचा विचार करत आहे. याबद्दल अमी त्रिवेदीला विचारले असता तिने या सर्व अफवा असल्याचं म्हटलं.  अमी म्हणते की, ‘मला या भूमिकेबद्दल कोणीही विचारले नाही. पण माझे मित्र मला सांगतात की ही भूमिका मी केली पाहिजे. दयाबेनच्या भूमिकेत मी चांगली दिसेन. पण अजूनपर्यंत मला यासंबंधीत निर्मात्यांनी मला संपर्क साधलेला नाही.’

या मालिकेचा चाहते वर्ग प्रचंड असून त्यांनी सोशल मीडियावर वेगवेगळे फॅन ग्रुप्स देखील बनवले आहेत. केवळ मालिकाच नव्हे तर या मालिकेतली पात्र म्हणजे जेठालाल, टप्पू, भिडे, दयाभाभी यांनी देखील प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे ही महत्वाची भूमिका पार पाडण्यासाठी निर्माते कोणती अभिनेत्री निवडतायत या बद्दल सर्वांना उत्सुकता लागली आहे.