'तारक मेहता...' मध्ये लवकरच परतणार दयाबेन ; पण आहेत 'या' अटी
दयाबेन-जेठालाल (Photo Credit : Instagram)

[Poll ID="null" title="undefined"] या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहचलेली दयाबेन अर्थात दिशा वकानी गेल्या काही काळापासून शोपासून लांब होती. पण आता लवकरच ती शोमध्ये कमबॅक करत असल्याची चर्चा आहे. पण कमबॅक करण्यासाठी दिशाने काही अटी पुढे केल्या आहेत.

# दिशा वकानी मॅटरनिटी लिव्हवर होती. सुट्टीवर जाण्यापूर्वी ती एका एपिसोडचे 1.25 लाख इतके मानधन घेत होती. आता मात्र ती एका एपिसोडचे 1.50 लाख रुपये डिमांड करत आहेत. यासोबतच काही अटीही समोर ठेवल्या आहेत.

# पहिली अट म्हणजे ती कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी 6 नंतर काम करणार नाही.

दुपारी 11 ते संध्याकाळी 6 याच शिफ्टमध्ये ती काम करेल.

# इतकंच नाही तर दिशा महिन्यातून फक्त 15 दिवसच काम करेल. बाकी कलाकार महिन्यातून 22-25 दिवस काम करतात.

# इतक्या अटी असूनही चॅनलने त्या सगळ्या मान्य केल्या आहेत. याचे कारण म्हणजे दयाबेन शो मधील प्रसिद्ध व्यक्तिरेखा असून ती भूमिका दिशा अगदी सरस करते. त्यामुळे तिच्याऐवजी दुसरी अभिनेत्री रिप्लेस करण्याचा चॅनलचा विचार नाही. म्हणूनच चॅनल आणि निर्माते दिशाच्या परतीची वाट पाहत आहे.

म्हणून दिशाच्या वाटेकडे सर्वांचे डोळे

दिशा मॅटरनिटी लिव्हवर असल्याने गेल्या वर्षभरापासून ती मालिकेपासून दूर आहे. त्यामुळेच कथानकातही काही बदल करण्यात आले. पण आता अधिक बदल करण्याची निर्मात्यांची इच्छा नसल्याने ते दिशाला परत यायला सांगत आहेत.

10 वर्षांचा यशस्वी पल्ला

'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका 2008 मध्ये सुरु झालेली असून तिला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. टीव्ही मालिकांमधील इतिहासात इतका चालणारा हा पाचवा शो आहे. या शोचे आतापर्यंत सुमारे अडीच हजारांहुन अधिक एपिसोड टेलिकास्ट झाले आहेत.