Bigg Boss Season 13, October 5 Weekend War: टास्कदरम्यान केलेल्या वर्तवणुकीमुळे शेफाली बग्गा हिला सलमान खान याने सुनावले, हिना खान हिची दमदार घरात एन्ट्री
Bigg Boss Season 13 (Photo Credits-Twitter)

विकेंड्च्या डाव सुरु होताच सलमान खान (Salman Khan) याची धमाकेदार एन्ट्री होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात घरातील सदस्यांना देण्यात आलेल्या टास्कची एक झलक दाखत त्यावेळी कोणी काय चुका केल्या आहेत हे दाखवले जाते. त्यानंतर सलमान खान सदस्यांना एक टास्क देऊ करतो. त्यामध्ये 'कनेक्शन खुर्ची' वर बसण्यासाठी घरातील सदस्यांपैकी कोण सर्वात एकमेकांच्या सोबत अधिक पटते हे अन्य सदस्यांना सांगायचे असते. त्यामध्ये शेहनाज आणि पारस यांना बहुमत मिळत ते दोघे त्या खुर्चीवर बसण्याचे मानकरी ठरतात.

तर घरातील सदस्य शेफाली बग्गा हिला सलमान खान हिच्याकडून सुनावले जाते. तसेच टास्कदरम्यान करण्यात आलेल्या वर्तवणूकीबाबत वाईट वाटले असे सांगते. मात्र सलमान खान दुसऱ्याच क्षणाला शेफाली हिला आजच्या नॉमिनेशनच्या टास्कपासून सेफ असल्याचे सांगतो. देवोलिना आणि रश्मी सेफ आहेत.(Bigg Boss 13: बिग बॉस 13 च्या घरात 4 थ्या आठवड्यात मिळणार Ticket To Finale, सोबत असणार ‘हा’ मोठा ट्विस्ट)

आजच्या विकेंडच्या डाव मध्ये हिना खान हिची एन्ट्री होते. त्यानंतर घरातील सदस्यांना सुपर मार्केट बजेटसाठी एक वस्तू बिबी हाउसमध्ये घेऊन जाण्याची संधी देण्यात येते. मात्र दुसऱ्या बाजूला हिना खान हिची बिबी हाउसच्या सुपर मार्केटमधील उपस्थितीनंतर ती घरातील सदस्यांना मार्केट मधील सामान किंवा घरातील व्यक्तींचा संदेश ऐकायचा आहे असे दोन ऑप्शन देऊ करते. मात्र घरातील सदस्यांना या प्रकारमुळे गोंधळाची स्थिती निर्माण होऊन त्यांच्या डोळ्यात घरातल्या सदस्यांच्या प्रति रडू कोसळल्याचे दिसून येते.