Bigg Boss 13: बिग बॉस 13 च्या घरात 4 थ्या आठवड्यात मिळणार Ticket To Finale, सोबत असणार ‘हा’ मोठा ट्विस्ट
A still of Salman Khan from the sets of Bigg Boss. (Photo Credits: File Photo)

भारतातील सर्वात मोठा रिअॅलिटी शो बिग बॉस 13 (Bigg Boss 13) ला अखेर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. बिग बॉसच्या 12 व्या पर्वाला अपेक्षेप्रमाणे लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे यावेळचा सीझन अधिक रंगतदार करण्यासाठी निर्मात्यांनी कंबर कसली आहे. म्हणून यावेळच्या सीझनमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. यातील एक महत्वाचा ट्विस्ट म्हणजे 4 थ्या आठवड्यात होणारा फिनाले (Finale). बिग बॉसचा सर्वसामान्य फिनाले हा 3 महिन्यांनतर होतो. मात्र या सीझनवेळी 4 थ्या आठवड्यात फिनाले पार पडणार आहे.

पिंकव्हिलाच्या रिपोर्ट्स नुसार, चौथ्या आठवड्यातच 13 सदस्यांपैकी एका स्पर्धकास अंतिम फेरीत प्रवेशाचे तिकीट म्हणजेच तिकीट टू फिनाले (Ticket To Finale) मिळेल. तर त्याच बिग बॉसच्या घरातून 6 लोकांचा प्रवास संपणार आहे. म्हणजेच एकाच वेळी 6 सदस्य एलिमिनेट होणार आहे. इतकच नाही तर त्यानंतर घरामध्ये एकाच वेळी अनेक सदस्यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री (Wild Card Entry) देखील होणार आहे. अशाप्रकारे बिग बॉसच्या 3 महिन्यांच्या प्रवासात चाहत्यांना अनेक सेलेल्ब्जच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन घडणार आहे. एकाच वेळी विविध टप्प्यांवर अनेक सदस्यांना बिग बॉसच्या पर्वात भाग घेतलं यावे आणि त्यामुळे टीआरपीमध्ये वाढ व्हावी हा मेकर्सचा विचार असावा. (हेही वाचा: Fans Reaction on Bigg Boss 13: बिग बॉस हाऊस आणि स्पर्धकांविषयी असे रिऍक्ट झाले फॅन्स)

पहिल्या फेरीत वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून प्रवेश करणाऱ्या सदस्यांमध्ये विराफ पटेल, राहिल आजम आणि अनुज सक्सेना यांच्या नावांची चर्चा आहे. तसेच यावेळी बिग बॉसने अभिनेत्री अमिषा पटेल हिला घराची मालकीण बनवून एक मोठी खेळी खेळण्याचा डाव रचला आहे. दरम्यान, बिग बॉसच्या या 13 व्या पर्वात रश्मी देसाई, सिद्धार्थ शुक्ला, माहिरा शर्मा, देवोलीना भट्टाचार्य, सिद्धार्थ डे, आरती सिंह, कोयना मित्रा, दलजित कौर, शेफाली बग्गा, पारस छाबरा, शहनाज गिल, असीम रियाज, अबू मलिक यांनी घरात प्रवेश केला आहे. हा रिअॅलिटी शो सोमवार ते शुक्रवार रात्री साडेदहा वाजता आणि शनिवार व रविवार रात्री 9 वाजता प्रसारित होत असून नेहमीप्रमाणे सलमान खान हा शो होस्ट करत आहे.