Fans Reaction on Bigg Boss 13:  बिग बॉस हाऊस आणि स्पर्धकांविषयी असे रिऍक्ट झाले फॅन्स
Salman Khan (Photo Credits: Twitter)

Bigg Boss Marathi चा दुसरा सीझन यशस्वीरीत्या संपताच काहीच दिवसात Bigg Boss Season 13 ची सुरुवात अगदी धमाकेदार झाली. 29 सप्टेंबर, 2019 रोजी, या कार्यक्रमाचा प्रीमिअर झाला आणि स्पर्धकांची नावं जाहीर होताच Twitteratis च्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.

सोशल मीडियावर सध्या संमिश्र प्रतिक्रिया दिसत आहेत. काही 'बिग बॉस प्रेमींनी शोची दिलखुलास स्तुती केली आहे तर काहींमध्ये मात्र तीव्र नाराजी दिसून येत आहे.

 

Fans' Reaction:

अनेकजण यंदाच्या सीझनच्या संकल्पनेच्या प्रेमात आहेत तर Bigg Boss 13 House काहींच्या विशेष पसंतीस पडले आहे. पण टीका करणाऱ्यांनी मात्र स्पर्धकांवर थेट निशाणा साधला आहे.

Trolls:

स्पर्धकांच्या यादीत यंदा 5 पुरूष आणि 8 महिला अशा एकूण 13 सदस्यांची नावे आहेत. सिद्धार्थ शुक्ला, रश्मि देसाई, कोयना मित्रा, सिद्धार्थ डे, पारस छाबडा, अबु मलिक, असिम रियाज, माहिरा शर्मा, देवोलीना भट्टाचार्जी, शहनाज गिल, शेफाली बग्गा, दलजित कौर, आरती सिंह या 13 सेलिब्रिटींनी Bigg Boss 13 च्या घरात प्रवेश केला आहे.