Shiv Thakare, Veena Jagtap (Photo Credits: Instagram)

Bigg Boss Marathi 2 मध्ये वीणा जगताप आणि शिव ठाकरे यांची जोडी खूपच हिट ठरली. शो संपून आता काही महिने उलटून गेले असले तरी या दोघांतील केमिस्ट्री काही कमी झालेली नाही, खरंतर दिवसागणिक त्यांच्यातील प्रेम अधिकच वाढत आहे असं म्हणायला हरकत नाही. दोघांच्याही सोशल मीडिया हॅण्डल्स एकमेकांसोबतच्या लवीडवी फोटोंनी भरलेले पाहायला मिळतात. विशेष म्हणजे शिव जसं बिग बॉस मराठीच्या घरात वीणासाठी खास सुरप्राइझ प्लॅन करायचा तसंच एक हटके सरप्राईझ त्याने तिच्यासाठी पुन्हा एकदा प्लॅन केलं होतं.

शिवने हे सरप्राईझ त्याच्या मुंबईतील घरी प्लॅन केलं होतं. घरभर फुलांच्या पाखळ्यांनी पायघड्या घालतसजावट केली होती. तसेच माणबत्त्यांनी रोषणाई देखील केली होती. वीणाच्या नावाचे फुग्यांनी सुद्धा त्याने भितींवर सजावट केली होती. वीणा जेव्हा शिवला भेटायला त्याच्या घरी पोहोचली तेव्हा हे सर्व पाहून भारावून गेली होती.

पाहा या सूप्राईझचे काही फोटो आणि व्हिडिओ,

दरम्यान, बिग बॉसच्या घरात असतानाचं या दोघांना एकमेकांबद्दल प्रेम वाटू लागले. दोघंही एकमेकांसमोर व्यक्त ही झाले होते. परंतु फिनालेमध्ये, वीणाला थोडी लवकर माघार घ्यावी लागली तर शिव बिग बॉस मराठी 2 चा विजेता ठरला.

Bigg Boss Marathi 2 विजेता शिव ठाकरे आणि वीणा जगताप नवस पूर्ण करण्यासाठी अनवाणी पोहचले वैष्णोदेवीच्या दर्शनाला: Exclusive

अलीकडे ही हिट जोडी वैष्णवदेवीच्या दर्शनाला देखील गेली होती. बिग बॉसच्या घरात बोललेला नवस पूर्ण कार्याकरिता ते दोघं वैष्णवदेवीला अनवाणी गेले होते.