Bigg Boss Marathi 2 विजेता शिव ठाकरे आणि वीणा जगताप नवस पूर्ण करण्यासाठी अनवाणी पोहचले वैष्णोदेवीच्या दर्शनाला: Exclusive
बिग बॉस मराठी घरातले लव्ह बर्ड्स शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांची केमिस्ट्री दिवसेंदिवस कमालिची रंगत आहे. सध्या ही जोडी कश्मीरमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे.
बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi 2) मधील लव्ह बर्ड्स शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि वीणा जगताप (Veena Jagtap) यांची केमिस्ट्री दिवसेंदिवस कमालिची रंगत आहे. 21 नोव्हेंबरला ही जोडी कश्मीरला गेली होती. आजचं ही जोडी मुंबईला परतली आहे. शिव आणि वीणा यांचे अनेक चाहते आहेत. बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात या जोडीला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून घेतले. शिवने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून वीणासोबचा एक फोटो शेअर केला आहे.
या पोस्टला शिवने 'इशारो इशारो मे दिल लेने वाले बता यह हुनर तुने सिखा कहा से', अशी कॅप्शन दिली आहे. 'LatestLY' मराठीला दिलेल्या Exclusive मुलाखतीत शिवने सांगितले की, 'आम्ही बिग बॉसची ट्रॉफी जिंकण्यासाठी वैष्णोदेवीला नवस बोलला होता. हा नवस पूर्ण करण्यासाठी मी आणि वीणा अनवाणी पायाने वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलो होतो. आम्ही कात्रापासून ते वैष्णोदेवीच्या मंदिरापर्यंत अनवाणी चाललो. अनवाणी जाताना वीणाला काही ठिकाणी थकवा जाणवत होता. तसेच तिकडे वातावरणात नेहमी बदल होत होते. आम्ही दोघांनी ही यात्रा एन्जॉय केली. मध्येच आलेल्या पावसामुळे आमचा आनंद द्विगुणीत झाला', असंही शिव म्हणाला. (हेही वाचा - 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या शूटिंगसाठी रणबीर-आलिया पोहचले मनालीला; पाहा खास फोटो)
शिव ठाकरे इन्स्टाग्राम पोस्ट -
View this post on Instagram
⭐️ Ishaaron Ishaaron mein Dil lene Wale Bata yeh Hoonar Tune Seekha Kahan se❤️⭐️
View this post on Instagram
Our gorgeous Veenie 😘💝💖 #veenajagtap #veenie #veenians #tumchiradha #cutie
दरम्यान, विणानेही आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काश्मीर टूरमधील फोटो शेअर केले आहेत. पुढील महिन्यात शिव एका नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. सध्या शिव आणि वीणा रिलेशनशिपमध्ये आहेत. परंतु, अद्याप त्यांनी लग्नाबद्दल कोणताही खूलासा केलेला नाही.
(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2019 04:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

