'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या शूटिंगसाठी रणबीर-आलिया पोहचले मनालीला; पाहा खास फोटो
Alia-Ranbir (PC - Instagram)

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट (Alia Bhatt) 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra Movie) चित्रपटाच्या शूटिंगसाठी मनालीला (Manali) पोहचले आहेत. मनालीत पोहचल्यानंतर रणबीर-आलियाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी रणबीर आणि आलिया सोबत अभिनेत्री मौनी रॉयही होती. दरम्यान, रणबीरच्या खांद्याला दुखापत झाली असूनदेखील तो शूटिंगसाठी मनालीला पोहचला आहे. मनालीमध्ये आजपासून 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे चित्रिकरण केले जाणार आहे. हे चित्रीकरण रोहतांगसह सोलंगनाला, गुलाबा, हामटा, नग्गर आणि रायसर या ठिकाणी पुढील दोन आठवड्यांपर्यंत चालणार आहे. (हेही वाचा - बॉलिवूड कपल रणबीर-आलियाच्या लग्नाविषयी दीपिकाने केला 'हा' मोठा खुलासा)

 

View this post on Instagram

 

#ranbirkapoor AT MANALI 🔥🔥

A post shared by ranbir kapoor (@ranbir_kapoor_officialll) on

या चित्रपटात बिग बींचीही भूमिका असणार आहे. त्यामुळे ते उद्या म्हणजेच बुधवारी मनालीत दाखल होणार आहेत. हे सर्व कलाकार मनालीतील 'स्पेन रिसॉर्ट' या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत. 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे. या चित्रपटात आलिया आणि रणबीरसह अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात नागार्जुन गंगेच्या काठी वसलेल्या पुरातन मंदिराचा शोध घेणाऱ्या पुरात्त्व शास्त्रज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'ब्रह्मास्त्र' च्या निमित्ताने अनेक वर्षांच्या कालखंडानंतर अमिताभ बच्चन आणि नागार्जुन एकत्र काम करत आहेत. 'अग्नी वर्षा' आणि 'खुदा गवाह' या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि नागार्जुन यांनी एकत्र काम केलं होतं.