बॉलिवूड कपल रणबीर-आलियाच्या लग्नाविषयी दीपिकाने केला 'हा' मोठा खुलासा
Alia Ranbir Deepika (PC - Instagram)

बॉलिवूडचं क्यूट कपल आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या लग्नाच्या चर्चांना चित्रपटसृष्टीत उधाण आलं आहे. परंतु, अद्याप रणवीर आणि आलियाने याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही. अनेक कार्यक्रमात आलिया-रणबीर एकत्र पाहायला मिळतात. गेल्या काही दिवसांपूर्वी आलिया-रणबीरच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली होती. परंतु, ती फेक असल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे आलिया आणि रणबीर लग्न करणार का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. मात्र आता चक्क दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) याबद्दल खुलासा केला आहे. आलिया लवकरचं लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं दीपिकाने सांगितलं आहे. (हेही वाचा - चंदा कोचर यांच्या ‘बायोपिक’ प्रदर्शनावर दिल्ली उच्च न्यायालयाची बंदी)

एका कार्यक्रमात दीपिका पदुकोण आणि आलिया भट यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात दाक्षिणात्य स्टार विजय देवरकोंडाही होता. यावेळी विजयला ‘तुला कोणती बॉलिवूड अभिनेत्री आवडते’? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी विजय देवरकोंडाने दीपिका आणि आलियाचं नाव घेतलं. यावर दीपिका म्हणाली की, 'माझं तर लग्न झालं आहे आणि आलियाचंदेखील आता होणार आहे.' दीपिकाने केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. परंतु, अद्याप आलिया आणि रणबीर कधी लग्न करणार हे कोणालाही माहित नाही.

 

View this post on Instagram

 

शिवा और इशा 💫 #brahmastra

A post shared by Alia ☀️ (@aliaabhatt) on

 

लवकरचं आलिया आणि रणबीर ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर दीपिका आपल्या ‘छपाक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आलियाने नुकतीच बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. त्यानंतर तिने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपले स्थान पक्के केले. आलिया लवकरच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. आलियाने स्वत:ची 'इटर्नल सनशाइन प्रॉडक्शन्स' नावाची निर्मिती संस्था सुरू केली आहे.