बिग बॉस मराठी सीझन 2 (Bigg Boss Marathi 2) चा विजेता शिव ठाकरे (Shiv Thackrey) आणि अंतिम फेरीतील स्पर्धक वीणा जगताप (Veena Jagtap) यांचे बिग बॉसच्या घरातील प्रेमप्रकरण आपण शो मध्ये पहिलेच असेल, पण शो दरम्यान नेहमी एकमेकांसोबत राहिलेले, बिनधास्तपणे प्रेमाची कबुली दिलेले हे दोघे लव्ह बर्डस घराबाहेर खऱ्या आयुष्यात आपलं नातं टिकवतील का याविषयी सर्वांना प्रश्न होते. या प्रश्नांचे उत्तर व आपल्या प्रेमाची ग्वाही देत वीणाने आता शिव ला एक गोड सरप्राईझ दिले आहे. येत्या काही दिवसात शिव ठाकरे याचा वाढदिवस असल्याने त्याआधी काहीतरी खास करायचे म्हणून वीणाने चक्क आपल्या हातावर शिव च्या नावाचा टॅटू काढला आहे. शिवने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून नुकताच हा टॅटू काढतानाचा फोटो शेअर केला ज्यांनंतर त्यांच्या फॅन्समध्ये या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.
शिव ठाकरे इंस्टाग्राम पोस्ट
(हे ही वाचा - अभिनेत्री स्मिता गोंदकर चा गोल्डन ड्रेसमधील हॉट लूक सोशल मिडियावर घालतोय धुमाकूळ)
बिग बॉसच्या घरात शिव आणि वीणा हे सुरुवातीपासून एकत्र होते, अनेकदा त्यांची जवळीक पाहता शो चे होस्ट महेश मांजरेकर यांच्यासह घरातील सदस्यांनी आक्षेप घेतला होता. पण तरीही शिव आणि वीणा काही वेगळे झाले नाहीत. एका टास्क दरम्यान वीणाला जिंकवण्यासाठी शिवने वीणाच्या नावाचा टॅटू आपल्या हातावर कोरून घेतला होता. यामुळे या दोघांचे नाते आणखीनच घट्ट झाले होते.बिग बॉस जिंकून बाहेर आल्यावर शिवने आपण लग्न करणार आणि लग्नाला अक्ख्या महाराष्ट्राला बोलवणार असेही म्हंटले होते. या सगळ्यात वीणाच्या बाजूने प्रेम व्यक्त करण्यात थोडी कसर होती पण घराबाहेर पडताच वीणाने देखील शिव च्या नावाचा टॅटू काढून एका प्रकारे आपल्या प्रेमाची ग्वाही दिली आहे.
दरम्यान, या आधी हिंदी आणि मराठी बिगबॉस सीझन मध्ये देखील अशी प्रेमप्रकरणे पाहायला मिळाली होती पण घराबाहेर पडताच या नात्यांचा काही निभाव लागला नव्हता. आता शिव आणि वीणा शो मध्ये म्हंटल्याप्रमाणे घराबाहेर पडल्यावर लग्न करतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.