Bigg Boss Marathi Season 2: बिग बॉसचं घर आता सीझन 2 साठी सज्ज होत आहे. मराठीमधील बिग बॉसच्या(Bigg Boss) पहिल्या पर्वाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता रसिकांना बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) 2 चं पर्व कधी सुरू होणार याची उत्सुकता लागली आहे. काही दिवसांपूर्वी बिग बॉसचा टीझर रसिकांसमोर आला मात्र अद्याप शो ऑन एअर कधी जाणार? याची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र टीझर लॉन्च झाल्यापासून बिग बॉस 2 च्या घरात कोण कोण कलाकार असतील याची चर्चा सर्वत्र असल्याने 'एप्रिल फूल'च्या पार्श्वभूमीवर 'बिग बॉस'च्या टीमने रसिकांवर एप्रिल फूल प्रॅन्क (April Fools Prank) केला. Bigg Boss Marathi Season 2: प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच मराठी बिग बॉस सिझन 2; पाहा टीझर
रसिकांचा एप्रिल फूल प्रॅन्क
तुमचा प्रयत्न छान होता पण April Fool करायचा आमचा प्लान होता.#HappyAprilFoolsDay #ColorsMarathi pic.twitter.com/AH4Nvvbv85
— Colors Marathi (@ColorsMarathi) April 1, 2019
बिग बॉस ट्विट
खूप चर्चा रंगली... आता अनाउन्समेंटची वेळ झाली कारण तो परत येतोय....#colorsmarathi#biggbossmarathi2 pic.twitter.com/pkFZacYxN6
— Bigg Boss Marathi official (@BIGGBOSSMARTHI) March 31, 2019
रविवारी रात्रीच बिग बॉस मराठीच्या ऑफिशिएअल ट्विटर अकाऊंटवरून 'आता अनाऊसमेंट्ची वेळ आली आहे.' अशा आशयाची एक पोस्ट आली. त्यानंतर 1 एप्रिलच्या सकाळी बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार्या काही स्पर्धकांच्या नावाच्या अद्याक्षराची एक पोस्ट शेअर करण्यात आली. यानंतर ट्विटरवर रसिकांनी त्यांचे अंदाज बांधले. मात्र अजूनही कोणाच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हा केवळ एप्रिल फूल असल्याचं सांगण्यात आलं आहे.
लवकरच रंगणार बिग मराठीचे पर्व दुसरे
बिग बॉसच्या घरामध्ये यंदा रसिका सुनील, कलर्स मालिकेवरून निरोप घेतलेल्या 'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेतील अक्षया गुरव, अर्चना निपाणकर आदी कलाकार झळकण्याची चर्चा आहे. केतकी माटेगावकरनेही तिच्या बिग बॉसच्या घरातील प्रवेश या अफवा असल्याचं म्हटलं आहे. बिग बॉसच्या नियमांनुसार शो सुरू होण्यापूर्वी त्यामधील कलाकारांची नावं जाहीर केली जात नाहीत. स्पर्धकांनाही नावं गुप्त ठेवण्याबाबत करार साईन करून घेतला जातो.
बिग बॉस 2 च्या पर्वामध्येही महेश मांजरेकर होस्टच्या रूपात दिसण्याची शक्यता आहे.