Bigg Boss Marathi Season 2: बिग बॉस स्पर्धकांच्या नावांची अद्याक्षरे जाहीर; हे असतील या पर्वातील स्पर्धक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Youtube)

मागच्यावर्षी बिग बॉस मराठीचे (Bigg Boss Marathi) पहिले पर्व चांगलेच लोकप्रिय ठरले होते. मेघा धाडेच्या खेळीमुळेतर लोकांनी आवर्जून हा शो पहिला. आता मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा झाली आहे. याच्या पहिला टीजरदेखील प्रदर्शित करण्यात आला आहे. आता चर्चा रंगली आहे ती यावेळी बोग बॉसच्या घरात कोण मंडळी एकत्र राहणार आहेत. यासाठी कलर्स मराठी वाहिनीकडून एक ट्वीट करण्यात आले होते, ज्यामध्ये यावर्षीच्या स्पर्धकांची अद्याक्षरे देण्यात आली होती. त्यावरून रसिकांना हे कोण कलाकार आहेत हे ओळखायचे आहे.

वै, आ, सु, चि, अ, प्रा अशी ही अक्षरे आहेत. यावरून 'बिग बॉस मराठी'च्या चाहत्यांनी वैदेही परशुरामी, अक्षया गुरव, चिन्मय मांडलेकर, सुव्रत जोशी, अभिनय बेर्डे, सुयश टिळक अशा वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान रसिका सुनील आणि केतकी माटेगावकर यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरु होती, मात्र या दोघींनीही या पर्वात तरी आपण सहभागी होत नसल्याचे सांगितले आहे. (हेही वाचा: 'बिग बॉस'चं घर आता मुंबईत?)

हिंदी आणि इतर अनेक भाषांमध्ये लोकप्रिय झाल्यानंतर बिग बॉस हा शो मराठीमध्येही सुरु झाला. मराठी प्रेक्षकांनी हा शोला भरभरून प्रतिसाद दिला. मेघा धाडे ही विजेती व्हावी म्हणून अक्षरशः चळवळ चालवण्यात आली. त्यामुळे आता दुसऱ्या पर्वालाही असाच प्रतिसाद मिळेल अशी अशा आहे.