केतकी माटेगावकर Bigg Boss Marathi 2 च्या घरात? 'इंस्टाग्राम'वर शेअर केली खास पोस्ट
Ketaki Mategaonkar (Photo credits: Instagram)

Bigg Boss Marathi 2 Contestant:  मराठी बिग बॉस सीझन 2 ची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली आहे. त्याचा पहिला टीझर पाहिल्यापासूनच ' बिग बॉस'च्या (Bigg Boss) रसिकांच्या मनात आता दुसऱ्या सीझनमध्ये कोणकोणते कलाकार हजेरी लावू शकतात याबद्दलची उत्सुकता वाढली आहे. रसिक त्यांचे काही तर्क वितर्क लढवत आहेत. अशामध्ये समोर आलेले एक नाव म्हणजे गायिका, अभिनेत्री केतकी माटेगावकर (Ketaki Mategaonkar). मात्र इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिने बिग बॉस प्रवेशाची बातमी अफवा असल्याचं म्हटलं आहे. Bigg Boss Marathi Season 2: प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच मराठी बिग बॉस सिझन 2; पाहा टीझर

केतकी माटेगावकर इंस्टाग्राम पोस्ट 

 

View this post on Instagram

 

PLEASE NOTE. #rumour #nottrue

A post shared by Ketaki Mategaonkar (@ketakimategaonkar) on

केतकी माटेगावकर ही बालगायिका म्हणून रसिकांच्या समोर पहिल्यांदा आली. मात्र हळूहळू गाण्यातून तिचा प्रवेश मराठी सिनेसृष्टीमध्ये झाला. अभिनयात दमदार पदार्पण केल्यांनतर आता केतकी बिग बॉसच्या घरात दिसणार अशी चर्चा रंगली होती. मात्र सध्या केतकीने या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. बिग बॉसमधील प्रवेश ही केवळ अफवा आहे. मला बिग बॉस पाहायला आवडतं. यंदाच्या सीझनमध्ये सहभागी होणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा अशा स्वरूपाची पोस्ट केतकीने शेअर केली आहे.  Bigg Boss Marathi Season 2: 'बिग बॉस'चं घर आता मुंबईत?

यंदा बिग बॉसच्या घरात शनाया फेम रसिका सुनील, कलर्सवरून रसिकांचा निरोप घेणाऱ्या 'राधा प्रेम रंगी रंगली' या मालिकेतील कलाकार दिसण्याची शक्यता आहे. अद्यापही बिग बॉस कधी सुरु होणार याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र पुढील महिन्याभरात हा शो सुरु होण्याची शक्यता आहे. महेश मांजरेकर हेच यंदाच्या सीझनचेही होस्ट असतील अशी मीडिया रिपोर्टमध्ये चर्चा आहे.