Bigg Boss Marathi 2: लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा नाईट ड्रेसमध्ये लावणीवर ठेका, 'मी सोडून सारी लाज' म्हणत वैशाली माडे यांनी दिली साथ  (व्हिडिओ)
Lavani queen Surekha Punekar | (Photo Credits:Twitter)

Lavani Queen Surekha Punekar Lavani Dance: छोट्या पडद्यावरील चर्चीत रिअॅलीटी शो Bigg Boss Marathi 2  नुकताच सुरु झाला. अपेक्षेप्रमाणे हे पर्वही वाद आणि चर्चा यांच्या मोहोळात प्रसिद्धीच्या झोतात राहणार असे दिसते. कार्यक्रमातील स्पर्धक आणि त्यांची स्वभाववैशिष्ट्ये स्पष्टपणे दिसू लागली असून, त्यांच्यातील विविध कलागुणांचेही दर्शन शोदरम्यान होत आहे. कधी अभिजित बिचुकले आपल्या गप्पांमधून सहकाऱ्यांचे कान चावतो, तर कधी वैशाली माडे आपल्या खास अंदाजात गाणं गाते. मंगळरच्या एपिसोडमध्ये लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर (Lavani queen Surekha Punekar) यांनी तर कमालच केली. सुरेखा पुणेकर (Surekha Punekar) यांनी चक्क नाईट ड्रेसमध्ये लावणी (Lavani Dance in Night Dress) या नृत्यप्रकारातील अदा दाखवल्या. आपणही सुरेखाताईंच्या लावणी (Lavani) अदा खालील ट्विटमधील व्हिडिओमध्ये पाहू शकता.

अलिकडील काळातील आघाडीच्या आणि विविध रिअॅलीटी शोमधून विजेत्या ठरलेल्या गायिका वैशाली माडे यासुद्धा Bigg Boss Marathi 2 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या आहेत. बुधवारच्या एपिसोडमध्ये वैशाली माडे आणि सुरेखा पुणेकर अशी जुगलबंधी पाहायला मिळाली. वैशाली माडे यांनी आपल्या खास आवाजात 'मी सोडून सारी लाज, अशी बेभान नाचले आज की घुंगरु तुटले रे' ही लावणी म्हटली आणि सुरेखा पुणेकर यांनीही या लावणीवर आपल्या खास अदा दाखवल्या.

बिग बॉस मराठी ट्विट व्हिडिओ

कोणतेही संगीत नसताना वैशाली माडे यांनी या लावणीतील काही मुखडे गायले आणि विशेष म्हणजे केवळ शब्द आणि सहकाऱ्यांनी दाद म्हणून वाजवलेल्या टाळ्या यांच्या जोरावर सुरेखा पुणेकर यांनी लावणीवर ठेका धरला. सुरेखाताईंनी सादर केलेल्या अदा इतक्या बारीक होत्या की, लावणी जाणकाराला त्यातील बारकावे सहज ध्यानात येतीलच. परंतू, जे केवळ रसिक आहेत, त्यांचेही लक्ष कोणत्याही श्रृंगाराशिवाय सादर केलेल्या लावणीने लावणीने खेचले गेले. (हेही वाचा, Bigg Boss Marathi 2, 28th May 2019, Day 2 Episode Updates: बिग बॉसच्या घरातील पहिले भांडण; माधवचे सटकले डोके, पहा काय आहे Nomination Task)

बिग बॉस मराठी 2 पर्वातील स्पर्धक

सुरेखा पुणेकर, वैशाली भैसने माडे, अभिजीत बिचुकले, किशोरी शहाणे विज, शेफ पराग कान्हेरे, अभिजीत केळकर, माधवी जुवेकर, रूपाली भोसले, माधव देवचक्के, विद्याधर जोशी, शिवानी सुर्वे, शिवा ठाकरे, वीणा जगताप, नेहा शितोळे, दिगंबर नाईक असे एकूण 15 स्पर्धक बिग बॉसच्या घरात धमाल करु पाहात आहेत.