Bigg Boss Marathi 2, 28th May 2019 (संग्रहित-संपादित प्रतिमा)

Bigg Boss Marathi 2, Episode 2 Highlights: बिग बॉस मराठी सिझन 2 च्या पहिल्या एपिसोडमध्ये घरातील सर्व सदस्यांनी अभिजित यांच्यावर कसे तोंडसुख घेतले हे आपण पहिले. सोबतच घरात सध्या नॉमिनेशन प्रक्रिया चालू आहे. सर्व सदस्यांच्या मते निवडलेल्या नावांपैकी शिव हा या आठवड्यासाठी थेट नॉमिनेट झाला आहे. अभिजित आणि वैशाली यांच्या लखोट्यात लीडर 1 आणि लीडर 2 असे लिहिले असते. तर मैथिली घरात राहण्यास पात्र ठरली आहे.

दुसऱ्या दिवशी रात्री, सर्वजण गार्डन एरियामध्ये गाणी म्हणत असताना, अचानक शिवानी इमोशनल होते. पहिल्याच दिवसाच्या शेवटी घरच्यांची आठवण येत असल्याने तिच्या अश्रूंचा बांध फुटतो. इकडे सुरेखा ताई आपल्या नृत्याने सर्वांचे मनोरंजन करतात. त्यानंतर अभिजित आणि वैशाली दोघेही लीडर या नात्याने आपापली टीम निवडतात. बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत घरात अशाच टीम्स कार्यरत राहणार आहेत.

दुसऱ्या दिवशी दोन्ही अभिजितमध्ये टीम्समधील सदस्यांबद्दल चर्चा होते. बोलताना अभिजित बिचुकले यांच्या तोंडातून रुपाली बद्दल ‘ठोकायचे’ असा शब्द बाहेर पडतो. यावरून शिवानी आणि अभिजित केळकर बिचुकले यांनी शब्द जपून वापरावे असे सांगतात. शिवानी तिच्या स्ववानुसार बाहेर जाऊन ही गोष्ट सर्वांना सांगते, आणि परत सर्वजण बिचुकले यांच्यावर तुटून पडतात. दरम्यान शिवानी बिचुकले किती खोटारडे आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करते. हळू हळू यात सर्व सदस्य सामील होऊन शाब्दिक चकमक वाढत जाते.

बिचुकले यांच्या टीममधून 2 सदस्यांना नॉमिनेट प्रक्रियेपासून सुरक्षित करण्यास बिग बॉस सांगतात. त्यानुसार सर्वजण एकमेकांशी चर्चा करीत असता, बिचुकले शिवानीला एकांतात आपला पुढचा प्लान सांगतात, त्याद्वारे त्यांना शिवानीने नेहाला नॉमिनेट करणे अपेक्षित असते. परत ही गोष्ट शिवानी सर्वांना सांगते आणि परत भांडणाला सुरुवात होते. याचाच फायदा घेऊन शिवानी, वीणा आणि वैशालीच्या टीममधील इतर सदस्य दुसऱ्या टीमला दिशाभूल करण्यासाठी मुद्दाम भांडण सुरु करतात. या भांडणात रुपाली बिचुकले यांच्या टीममधील सदस्यांना हा सर्व लीडर आणि सदस्यांमध्ये मुद्दाम फुट पडण्याचा प्रयत्न असल्याचे सांगते. (बिचुकले हे शिवानीवर विश्वास ठेऊन तिच्याशी सर्व गोष्टी शेअर करत आहेत मात्र शिवानी याचा गैरफायदा घेत आहे. शिवानीचा हाच दुतोंडी स्वभाव तिला पुढे जाऊन भारी पडू शकतो)

अभिजित आणि वैशाली लीडर असल्याने ते या आठवड्यासाठी नॉमिनेट होणार नाहीत. अभिजितच्या टीममधून नॉमिनेशन प्रक्रियेमधून माधव आणि दिगंबर यांना सुरक्षित केले जाते. अखेर बिग बॉस कडून पहिल्या आठवड्यातील नॉमिनेट टास्क 'सवाल ऐरणीचा' सांगितला जातो. आता पुढील भागात उत्सुकता आहे ती या टास्कबद्दल.

(इथे दोनच दिवसांत बिचुकले यांचा स्वभाव आणि फटकळ वृत्तीमुळे घरातीत सर्व सदस्य वैतागले आहेत. मात्र TRP साठी बिचुकले यांना घरात ठेवणे बिग बॉससाठी फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे बिचुकले घरात राहतील का नाही याचा निर्णय लवकरच होईल. तूर्त तरी त्यांना अभय मिळाले आहे.)