अखेर मराठीमधील सर्वात बहुप्रतीक्षित शो, बिग बॉस मराठी सिझन 2 (Bigg Boss Marathi 2) कालपासून सुरु झाला. बिग बॉसच्या घरात तब्बल 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ हे सेलेब्ज एकमेकांसोबत राहणार आहेत. मागच्या सिझनमध्ये मेघा धाडेच्या आक्रमक खेळीमुळे तिने तमाम प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यामुळे हा सिझन कोणते नवे रंग घेऊन येतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आजचा या घरातील 15 सेलिब्रिटी लोकांचा पहिला दिवस, जाणून घ्या नक्की काय घडले आजच्या भागात (Bigg Boss Marathi 2, 27th May 2019, Day 1 Episode Updates)
दिवसाची सुरुवात होते रॅपचिक गाण्याने होते. स्वतः महेश मांजरेकर यांनी गायलेल्या गाण्यावर सर्वजन नृत्य करतात.
दुपारी सर्व सदस्यांसाठी बिग बॉसकडून स्वयंपाकाचे, किराणा समान पाठवले जाते. जेवणाच्या टेबलवर अभिजीत बिचुकले ‘आया मौसम दोस्ती का’ हे गाणे गाऊन सर्वांचे मनोरंजन करतात. बोलताना शिवानी तिचे होणारे सासर हे साताऱ्याचे असल्याचे नमूद करते. त्यावर अभिजित आणि शिवानी यांच्यामध्ये याबाबत चर्चा होते. हे सर्व चालले असताना इतर सदस्य अभिजितच्या वागण्यामुळे त्रासलेले दिसतात. वैशाली याबाबत अभिजितला समजाऊन सांगते.
परत संध्याकाळी अभिजित आणि शिवानी पहिल्याच दिवशी घरात ग्रूपीझम चालू असल्याबाबत बोलतात. आपल्या दोघांचा एक ग्रुप करूया असे म्हणत अभिजित शिवानीचे इतर सदस्यांबद्दल कान भरताना दिसतो. त्यानंतर परत अभिजित आणि वीणामध्ये फरशी पुसायची यावरून बाचाबाची होते. अभिजितने फरशी पुसायला नकार दिल्याने सर्वजन त्याच्यावर त्याच्यावर तुटून पडतात. अखेर अभिजित सर्वांची भांडी घासेल असा निर्णय घेतला जातो. संध्याकाळी रुपाली आणि पराग एकमेकांच्या लग्नाबद्दल आणि घटस्फोटाबद्दल बोलतात. सिझन संपल्यावर पराग तिला गोव्याला येण्याचे निमंत्रण देतो.
संध्याकाळी बिग बॉस सदस्यांना एक काम देतात. सर्व सदस्यांनी एकमेकांच्या संमतीने घरातील 4 अपात्र सदस्यांची नावे सुचवायची आहेत. चर्चा करून, एकमेकांची मते मांडून सर्वजणांकडून अभिजित बिचुकले, शिव, वैशाली आणि मैथिली अशी नावे ठरवली जातात. या दरम्यान सदस्यांचे एकमेकांबद्दल असलेली मते आणि विचार बाहेर पडतात.
हा टास्क झाल्यानंतर शिवानी ग्रुप बनवण्याबाबत अभिजित यांना टोमणा मारते. अभिजित यांच्याबद्दलचा राग तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. घराच्या विविध भागातही अभिजित कसा Irritating आहे याबाबद्दल चर्चा चालू असते. रात्री सर्वजण एकत्र बसले असता, शिव आणि वैशालीमध्ये एकमेकांची नावे घेतल्याबद्दल खटका उडतो. सुरु झालेली शाब्दिक चकमक भांडणात बदलते.
रात्री 10 वा, या चारही अपात्र सदस्यांना बिग बॉस Activity Room मध्ये बोलावतात. या चारही जणांना आपापली जागा ठरण्यास सांगतात. त्यानंतर त्यांच्यासमोरील कप्प्यामध्ये ठेवलेला लखोटा वाचण्यास सांगतात. यामध्ये पहिल्या आठवड्यात शिव घराबाहेर होण्यासाठी Nominate होतो. मैथिलीचा लखोटा कोरा असल्याने ती घरात राहण्यास पात्र ठरते. आता उद्या अभिजित आणि वैशालीच्या नशिबी कोणता लखोटा येतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.