Asit Kumarr Modi Tests COVID-19 Positive (Photo Credits: Instagram)

हिंदी टेलिव्हिजन वरील लोकप्रिय विनोदी मालिका ' तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिका इतर मालिकांच्या तुलनेत जरा उशिराने पुन्हा चित्रीकरणाला सज्ज झाली. तारक मेहता.. ची टीम कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर अधिक सुरक्षित राहून कामाला सुरवात करण्याचा प्रयत्न करत होती. पण अखेर या मालिकेच्या सेटवरही कोरोना वायरसने प्रवेश केला आहे. तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित कुमार मोदी (Asit Kumarr Modi)  यांना कोरोना वायरसची लागण झाली आहे.

कोविड 19 च्या प्रादुर्भावाची माहिती असित कुमार मोदी यांनी स्वतः ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. काल (20 नोव्हेंबर) दिवशी ट्वीटरवरून त्यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. तसेच 'कोविडच्या काही लक्षणांमुळे मी चाचणी करून घेतली आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या आरोग्याची काळजी करू नका. तुमच्या प्रेमाने, आशिर्वादाने लवकरच ठीक होईन' असे त्यांनी म्हटलं आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा च्या जेठालालची इंस्टाग्राम वर एंट्री; अभिनेता दिलीप जोशी यांनी केली 'ही' पहिली पोस्ट.

 

असित कुमार मोदी ट्वीट

सध्या तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका मराठी मध्येही जुने एपिसोड डब करून दाखवले जात आहेत. तर हिंदी मालिकेमध्ये नव्याने शूटिंग सुरू झाले आहे. 'गोकुळधाम' मधील भारतातील विविध प्रदेशातील लोकांची एकत्र धम्माल दाखवली जाते. यामध्ये अनेक सामाजिक प्रश्नांवर खुमासदार, विनोदी अंगाने भाष्य केले जाते.