प्रसिद्ध टीव्ही मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) मधील सर्वच पात्र मागील 12 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. सोशल मीडियावर सुद्धा या कलाकारांच्या नावाने अनेक फॅन पेजेस आहेत. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट ना सुद्धा हजारो फॉलोअर्स आहेत. अशात आता मालिकेतील मुख्य भूमिका जेठालाल (Jethalal) साकारणारे अभिनेता दिलीप जोशी (Dilip Joshi) यांनी इंस्टाग्राम वर एंट्री घेतली आहे. अलीकडेच दिलीप जोशी यांनी आपले अधिकृत इन्स्टा अकाउंट सुरु केले असून त्यात पहिली पोस्ट ही आपल्या आई आणि भावांसोबत टाकली आहे. काहीच तासात दिलीप जोशी यांच्या अकाउंट वर 2 लाख 81 हजार फॉलोअर्स आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा मधून आणखीन एक अभिनेत्री बाहेर; लवकरच होणार बाघा- बावरीच्या लव्हस्टोरीचा End?
दिलीप जोशी यांनी अकाऊंट सुरु करताच अनेक फॅन्स नी सुरुवातीला विश्वास ठेवायलाच नकार दिला. अर्थात आपल्या आवडीचा कलाकार जेव्हा फायनली सोशल मीडियावरून एक मॅसेज दूर अंतरावर यश तेव्हा ही भावना नॉर्मल आहे, अनेकांनी हे अकाउंट फेक किंवा फॅन्स अकाउंट असल्याचे सुद्धा म्हंटले. पण दिलीप जोशी यांनी एक खास व्हिडीओ बनवून हे अकाउंट खरे असल्याचे सुद्धा सांगितले आहे.
दिलीप जोशी पोस्ट
लॉक डाउनच्या नंतर आता मागील आठवड्यापासून तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेचे सुद्धा पुन्हा प्रक्षेपण सुरु झाले आहे,चार महिन्याच्या ब्रेक मध्ये नेहमी दिवसभर ही मालिका बघून लोकांनी खूप एन्जॉय केले होते. मालिकेच्या जुन्या भागांचे आजही लाखो चाहते आहेत. भारतीय टीव्हीही इंडस्ट्री मध्येसर्वाधिक काळासाठी चालणारी आणि नेहमी टीआरपी मध्ये टॉप ला असणारी ही सब टीव्हीची सर्वात प्रसिद्ध मालिका आहे.