तारक मेहता का उल्टा चष्मा मधून आणखीन एक अभिनेत्री बाहेर; लवकरच होणार बाघा- बावरीच्या लव्हस्टोरीचा End?
Tarak Mehta Ka Ooltah Chashmah (Photo Credits: Instagram)

हिंदी मालिकांच्या हिट लिस्ट वर मागील 11 वर्षांपासून टॉपवर असणारी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Tarak Mehta ka Ooltah Chashma) ही मालिका हल्ली मनोरंजनापेक्षा कलाकारांनी शो सोडल्याने अधिक चर्चेत आहे. दोन वर्षांपूर्वी मालिकेतील दयाबेन (Dayaben) ही मुख्य भूमिका साकारणारी दिशा वाकाणी (Disha Vakhani) हिने गरोदरपणामुळे सुट्टी घेतली होती, त्यानंतर अद्याप काही दिशा शो मध्ये परतलेली नाही, तर, काहीच दिवसांपूर्वी सोनू भिडे म्हणजेच निधी भानुशाली (Nidhi Bhanushali) हिने देखील वैयक्तिक कारणाने कार्यक्रम सोडला होता. यापाठोपाठ आता तारक मेहता मधील आणखीन एक अभिनेत्री शो सोडणार असल्याचे समजत आहे. ही अभिनेत्री म्हणजे बावरी हि भूमिका साकारणारी मोनिका भदोरिया (Monika Bhadoriya)  आहे. मोनिकाचे शोच्या मेकरसोबत मानधनावरून काही दिवस वाद सुरु होते, मात्र मेकर्स आपले पेमेंट वाढवून देत नसल्याचे सांगत आता तिने स्वतः आपल्या शो मधील एग्झिटवर शिक्कामोर्तब केले आहे.

मोनिका मागील 7 वर्षांपासून मालिकेत बावरीचे पात्र साकारत आहे. तिचे काही हटके डायलॉग्स जसे की, "हाय हाय गलती से मिस्टेक होगयी", सर्वांची चुकीची नावे घेणे, आणि मुख्य म्हणजे बाघा सोबतची तिची लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या प्रवासाबद्दल "ती मालिकेतील पात्र निश्चितपणे माझ्या खूप जवळचे आहेत. मला चांगले मानधन मिळावे अशी माझी मागणी होती. परंतु, ती पूर्ण न झाल्याने मी या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, असे मोनिकाने सांगितले.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील रिपोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)

 

View this post on Instagram

 

A post shared by Monika sushma bhadoriya (@monika_bhadoriya) on

दरम्यान, मोनिकाने या मालिकेतला अखेरचा एपिसोड 20 ऑक्टोबर रोजी शूट केला होता. बावरीच्या म्हणजेच मोनिकाच्या जागी नवीन अभिनेत्री येणार की तिच्या पात्राची कथा संपवली जाणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरत आहे.