Ranveer-Alia च्या Gully Boy साठी Priyanka ची फिल्डिंग; भारताला Oscar मिळवून द्यायचं घेतलं मनावर
Priyanka to promote gully boy for oscar | (Pic courtesy: Facebook)

चित्रपटांच्या दुनियेतील सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या ऑस्कर (Oscar) चित्रपटासाठी यंदा भारताकडून 'गली बॉय' (Gully Boy) या चित्रपटाची इथे वर्णी लागली आणि तिथे प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) चित्रपटाला पुरस्कार मिळावा यासाठी फिल्डिंग सुद्धा सुरु केली. ऑस्कर हा अत्यंत मानाचा पुरस्कार आणि तसेच मिळवायला अतिशय कठीण. आजवरच्या इतिहासात बॉलीवूडला मात्र ऑस्कर मधून रिकाम्या हातीच परतावं लागलं आहे. पण या वेळी असे पुन्हा होऊ नये यासाठी प्रियांका चोप्रा मैदानात उतरली आहे.

'गली बॉय'ला ऑस्कर मिळावा यासाठी प्रियांका जोरदार प्रचार तंत्र अवलंबणार आहे. प्रियांका आपल्या हॉलीवूड मधील मित्रांसाठी या चित्रपटाचं खास स्क्रीनिंग महिना अखेरीस आयोजित करणार आहे. तसेच डिसेंबर येईपर्यंत अमेरिकेत अजून काही स्क्रीनिंग्स विविध भागात करण्याचा तिचा निर्धार आहे. डिसेंबर महिन्यात ऑस्करची नामांकन यादी घोषित केली जाणार आहे. यासाठी जगभरातून शेकडो चित्रपटांच्या प्रवेशिका असतात. त्यामुळे त्यातून पुढे जाण्यासाठी पूर्वप्रसिद्धी होणे फार गरजेचे ठरते. (हेही वाचा. Oscar 2020: शेतकऱ्याची कथा मांडणाऱ्या 'मोती बाग' डॉक्युमेंट्रीला ऑस्कर नॉमिनेशन ;भारताची दुसरी एंट्री निश्चित)

'गली बॉयची' दिग्दर्शिका झोया अख्तर (Zoya Akhtar) आणि अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) यांच्याशी प्रियांका चोप्राची चांगली मैत्री आहे. या तिघांनी 'दिल धडकने दो' (Dil Dhadakne Do) या चित्रपटात सोबत काम केले होते. तसेच प्रियांका आलिया भट्टच्या (Alia Bhatt) कामाचीही चाहती आहे.

तर दुसरीकडे, गेल्या आठवड्यात प्रियांकाचा 'द स्काय इज पिंक' हा चित्रपट प्रदर्शित झाला. तब्बल तीन वर्षांनंतर तिने बॉलीवूडपटात काम केले आहे. समीक्षकांच्या चांगल्या रिव्ह्यूजनंतरही चित्रपट बॉक्स ऑफिस वर आत्तापर्यंत म्हणावी तशी कमाई करू शकला नाहीये.