Moti Bagh (Photo Credits: Twitter)

गल्ली बॉय (Gully Boy) सिनेमाची ऑस्कर (Oscar 2020) वारी निश्चित झाल्यानंतर पाठोपाठ लगेचच भारतीयांसाठी आणखीन एक आनंदाची वार्ता समोर येत आहे. ऑस्करच्या नामांकन यादीत सर्वोत्कृष्ट माहितीपट (Best Documentary) या गटात भारताच्या मोती बाग (Moti Bagh) या डॉक्युमेंट्रीला देखील स्थान प्राप्त झाल्याचे समजत आहे. निर्मल चंदर दांद्रियाल (Nirmal Chander Chandriyal) दिग्दर्शित हा माहितीपट हिमालयातील एका शेतकऱ्याच्या जीवनसंघर्षाची कथा मांडणारी कलाकृती आहे. नुकतेच ऑल इंडिया रेडियोने एका ट्विट मार्फत ही अधिकृत घोषणा केली. हिंदी भाषेतील या 60 मिनिटांच्या माहितीपटाची निर्मिती दूरदर्शन (Doordarshan) व पीएसबीटी (PSBT) तर्फे करण्यात आली आहे.

भारत हा शेतीप्रधान देश असताना सुद्धा अनेकदा हा अन्नदाता दुःखात असतो, त्याहून वाईट म्हणजे त्याच्या परिश्रमाची कदर केली जात नाही, याच पार्श्वभूमीवर एका 83 वर्षीय प्रातिनिधिक शेतकऱ्याची कथा मोती बाग मधून मांडण्यात आली आहे. ह्या सामान्य शेतकऱ्याचे कष्ट, नैसर्गिक आपत्ती आणि सरकारी उदासीनता यांना तोंड देत परिस्थितीला सामोरे जाण्याचा अनुभव हे कथेतून दिसून येतात. साहजिकच माहितीपट असल्याने साधा विषय आणि कमी जाहिरात अशा स्वरूपात कथा प्रदर्शित करण्यात आली होती, मात्र आता थेट ऑस्करचे तिकीट मिळाल्यावर दिग्दर्शक व अन्य सहकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

AIR ट्विट

याबाबात उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून मोती बाग च्या यशासाठी अभिमान व आनंद व्यक्त केला.गल्ली बॉय सिनेमाला 'या' कारणासाठी ऑस्कर मिळणार नाही; कमाल खान ची ट्विटर वर भविष्यवाणी

त्रिवेंद्र सिंग रावत पोस्ट

दरम्यान, याबाबत मोती बाग चे दिग्दर्शक यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेतून, निदान आता तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासन गांभीर्याने पाहिलं तसेच सहानुभूतीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करेल अशी इच्छा व्यक्त केली आहे.