बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan), निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) आणि तिची आई शोभा कपूर (Shobha Kapoor) यांना ऑस्करने (Oscar) आमंत्रित केले आहे. तिघीही अॅकॅडमी अवॉर्ड क्लास 2021 (Class Of 2021) चा भाग असणार आहेत. ऑस्करच्या संचालक मंडळाने ‘मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ या संस्थेद्वारे जगभरातील 395 लोक निवडले आहेत, जे ऑस्करमध्ये मतदान करू शकतील. यामध्ये चित्रपटांशी संबंधित अभिनेते-अभिनेत्री, निर्माता, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांचा समावेश आहे. अभिनेत्री म्हणून विद्या बालन तर निर्मात्या म्हणून एकता कपूर आणि शोभा कपूर यांना निमंत्रित केले आहे.
94 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी चित्रपटांना मतदान करण्यासाठी 50 देशांतील विविध लोकांचा या यादीमध्ये समावेश आहे. मागच्यावर्षी या यादीमध्ये 819 लोक सहभागी होते, यंदा ही संख्या कमी करून 395 लोकांना निमंत्रण पाठवले आहे. या 395 लोकांपैकी 89 लोक असे आहेत ज्यांना ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे, तर 25 चेहरे असे आहेत ज्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. व्होटिंगसाठी अंद्रा डे, व्हेनेसा किर्बी, रॉबर्ट पॅटिनसन आणि युह-जंग युन यांनाही अकादमीकडून निमंत्रण गेले आहे.
It's time to announce our new members! Meet the Class of 2021. https://t.co/17gbIEXOzJ #WeAreTheAcademy
— The Academy (@TheAcademy) July 1, 2021
असे सांगितले जात आहे की 94 व्या ऑस्कर पुरस्काराची घोषणा 27 मार्च 2022 रोजी होऊ शकते. 'तुम्हारी सुलू' आणि कहाणी मधील अभिनयामुळे विद्या बालनला एक वेगळी ओळख मिळाली. एकता कपूरला 'ड्रीम गर्ल' आणि 'वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई' या चित्रपटांसाठी, तर तिची आई शोभा कपूर यांना 'उडता पंजाब' आणि 'द डर्टी पिक्चर' साठी ऑस्करने निमंत्रित केले आहे. (हेही वाचा: 365 Days अभिनेता Michele Morrone लवकरच करू शकतो बॉलिवूडमध्ये डेब्यू; Karan Johar ने संपर्क साधल्याची चर्चा)
विद्या बालनच्या आधी दिवंगत वेशभूषा डिझाईनर भानु अथैया, निर्माता व अभिनेता आमिर खान, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, संगीतकार ए.आर. रहमान, ध्वनी डिझायनर रसूल पुकुट्टी यांनाही अकादमीचे सदस्य म्हणून समाविष्ट केले गेले आहे.