365 Days अभिनेता Michele Morrone लवकरच करू शकतो बॉलिवूडमध्ये डेब्यू; Karan Johar ने संपर्क साधल्याची चर्चा
365 Days Star Michele Morrone, Karan Johar (Photo Credits: Instagram)

इटालियन अभिनेता मिशेल मोरोन (Michele Morrone) नुकताच 365 डेज चित्रपटात (365 Days) दिसला होता. या चित्रपटातील मिशेलच्या अभिनयाने सर्वांची मन जिंकली आहेत. हा चित्रपट एका कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटानंतर मिशेल रातोरात स्टार बनला. या चित्रपटामध्ये त्याने अनेक बोल्ड सिन्स दिले आहेत, ज्यामुळे त्याचा चाहता वर्ग बराच वाढला आहे. आता मिशेल लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकतो. मिशेलने त्याच्या एका मुलाखतीत बॉलिवूडच्या योजनांबद्दल सांगितले आहे. वृत्तानुसार करण जोहरने एका प्रकल्पासाठी मिशेलशी संपर्क साधला आहे.

मिशेल हा एक अभिनेता तसेच गायक, मॉडेल आणि फॅशन डिझायनर आहे. मिशेलने सांगितले की, जेव्हा बॉलिवूड इंडस्ट्री त्याला कास्ट करण्यात रस दाखवित असल्याचे लक्षात आले, तेव्हा त्याची मॅनेजमेंट टीमही भारतात विस्तार करत आहे.

बॉम्बे टाईम्ससोबत झालेल्या एका खास संभाषणात मिशेलने त्याच्या बॉलिवूड योजनांविषयी चर्चा केली. यावेळी मिशेल म्हणाला, हिंदी चित्रपट इंडस्ट्री म्हणजेच बॉलिवूड ही खूप मोठी इंडस्ट्री आहे. मला बॉलिवूडमध्ये तयार होणारी संस्कृती, संगीत, रंग आवडतात. मला याबद्दल फारशी माहिती नाही, परंतु नुकतेच मी बॉलिवूडविषयी माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. मला नक्कीच हिंदी चित्रपट करायला आवडेल. अभिनेता म्हणून मला आव्हानात्मक भूमिका करायला आवडतात.

मिशलने सांगितले की बॉलिवूडच्या बर्‍याच प्रकल्पांसाठी त्याच्या टीमशी संपर्क साधला गेला आहे. म्हणूनच तो आता भारतामध्येही आपली टीम वाढवत आहे. मिशेलने याआधी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे मात्र जागतिक पातळीवर त्याने अजूनही काम केले नाही, त्यामुळे बॉलिवूडमधील डेब्यूबाबत तो उत्साहित आहे. (हेही वाचा: Kehlani On Sexuality: केहलानी म्हणते 'आता मला कळलं, मी Lesbian आहे')

दरम्यान, नुकतेच काही खासगी फोटो लीक झाल्याने मिशेल चर्चेत आला होता. मिशेलला ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती. त्याने याबाबत नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. 'एक अभिनेता म्हणून तुमचे आयुष्य सार्वजनिक होते, मात्र एक व्यक्ती म्हणून मला माझी प्रायव्हसी प्रिय आहे.’