Kehlani On Sexuality: केहलानी म्हणते 'आता मला कळलं, मी Lesbian आहे'
American Singer Kehlani | (PC - Instagram)

प्रसिद्ध अमेरिकी गायिका केहलानी (American Singer Kehlani) हिने अखेर तिच्या लैंगिक ओळखीबद्दल स्वत:च आणि प्रथमच खुलासा केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तिने ही माहिती दिली आहे. एकाहून एक सरस आणि लोकप्रिय असे म्यूजिक व्हिडिओ आणि बोल्डनेस आदी कारणांमुळे नेहमी चर्चेत असलेल्या कोहलानी (Kehlani) हिने पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांचे मथळे आणि सोशल मीडियावरील अवकाश व्यापला आहे. कोहलानी हिच्याबाबत सध्या सुरु असलेली चर्चा ही तिच्या एखाद्या व्हिडिओ किंवा म्यूझिक अल्बममुळे नाही. ही चर्चा आहे तिने स्वत:च्या लैंगिकतेबाबत केलेल्या विधानामुळे. केहलानी हिने म्हटले आहे की आता मला माझी लैंगिक ओळख (Sexuality) कळली आहे. मी समलिंगी (Gay) म्हणजेच लेस्बियन (Lesbian) आहे.

कोहलानी हिने आपली लैंगिक ओळख जाहीर करताच सोशल मीडियावर जोरदार प्रतिक्रिया आल्या आहेत. यातील काही प्रतिक्रिया कोहलानी हिच्या बाजूने आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत केहलानी हिने म्हटले आहे की, मी समलैंगिक, समलैंगिक, समलैंगिक आहे. अखेर मला माझी ओळख कळली आहे. केहलानी हिने टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून आपली नवी ओळख जगासमोर आणली आहे. केहलानी हिने केलेल्या वक्तव्याबाबत तिच्या कुटुंबीयांनी 'तिच्या बाबत आम्हाला माहिती आहे' असे म्हटले आहे. (हेही वाचा, Miley Cyrus Goes Topless: अमेरिकेची प्रसिद्ध अभिनेत्री मायली सायरल हिचा टॉपलेस फोटोशूट पाहून सर्वांनीच उंचावल्या भुवया, पहा Hot Photos)

American Singer Kehlani | (PC - Instagram)

आयएनएस आणि फीमेलफर्स्ट डॉट को डॉट यूके ने दिलल्या वृत्तानुसार, गायिका केहलानी हिने आगोदर म्हटले होते की, ती स्वत:ला स्त्री आणि पुरुष अशा दोन्ही रुपात समजते. जेव्हा मी आपल्या घरी होती तेव्हा मी स्वत:ला एक पुरुष समजते. जेव्हा मी शांत आणि चिंतन करते तेव्हा मी स्वत:ला एका महिले प्रमाणे समजते. पुढे बोलताना तिने म्हटले आहे की, मी स्त्रित्व तेव्हा अधिक अनुभवते जेव्हा मी स्वत:साठी वेळ काढते आणि छान स्नान (अंघोळ) करते. जेव्हा मी काही फुले घेते आणि हेअरम मास्क लावते. जेव्हा मी आरशात बघून शरीराला तेल लावते तेव्हा मी स्वत:ला सर्वात सुंदर समजते.

केहलानी सांगते माझे स्त्रित्व मला कोमल अनुभूती देते. माझ्या मर्दानगीच्या तुलनेत मला अधिक सावधानता दर्शवते. मला वाटते मी स्त्री आणि पुरुष अशा दोन्हीचाही थप्पा मला लावू इच्छित नाही. कारण माझ्यासाठी ही अगदीच किरकोळ बाब आहे. परंतू, मी दोन्ही बाजूंनी योग्यच आहे.