Lata Mangeshkar Passes Away: स्वर कोकिळा लता मंगेशकर यांना पहिल्या कमाईत मिळाले होते 25 रुपये, 'या' कारणामुळे केलं नाही लग्न
Lata Mangeshkar (PC- ANI)

Lata Mangeshkar Passes Away: भारतरत्न स्वर कोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) आता आपल्यात नाहीत, लताजींचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या घरी एका मध्यमवर्गीय मराठा कुटुंबात झाला. लता पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या थोरल्या कन्या होत्या, त्यांचे वडील थिएटर कलाकार आणि गायक होते. ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर या चित्रपटसृष्टीतील अशा एक गीतकार आहेत, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य केवळ गायन आणि कुटुंबासाठी वाहून घेतले. (वाचा - Lata Mangeshkar Passes Away: लता दीदींच्या निधनाने देशात 2 दिवसीय राष्ट्रीय दुखवटा; जाणून घ्या राष्ट्रीय दुखवटा म्हणजे काय असतं?)

वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षापासून गायनाच्या दुनियेत प्रवेश करणाऱ्या लता दीदींनी सिनेमाला विविध भाषांमध्ये अनेक सुपरहिट आणि संस्मरणीय गाणी दिली. जी कायम स्मरणात राहतील. लता दिदिंनी आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय का घेतला? जाणून घेऊयात... (वाचा - Lata Mangeshkar Passes Away: जयोस्तुते श्रीमहन्मंगले ते मोगरा फुलला लता मंगेशकर यांची 'ही' मराठी गाणी आजही करतात मंत्रमुग्ध!)

लता दिदिंना पहिले गाणे गाण्यासाठी मिळाले होते 25 रुपये -

लताजींना पहिल्यांदा स्टेजवर गाण्यासाठी 25 रुपये मिळाले, ज्याला त्या त्यांची पहिली कमाई मानतात. लताजींनी 1942 मध्ये 'किती हसाल' या मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदा गाणं गायलं होतं. लतादीदींचा भाऊ हृदयनाथ मंगेशकर आणि बहिणी उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि आशा भोसले या तिघांनीही संगीताची निवड केली. (वाचा - Lata Mangeshkar Passes Away: लता मंगेशकर यांच्यावर सायंकाळी 6.30 वाजता शिवाजी पार्क येथे संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार)

लता दिदिंनी लग्न का केलं नाही?

लता मंगेशकर यांनी लग्न का केले नाही? याचे उत्तर त्यांनी स्वतः दिले आहे. लतादीदींनी एका मुलाखतीत सांगितले होते की, घरातील सर्व सदस्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. अशा परिस्थितीत लग्नाची कल्पना अनेकवेळा आली तरी, ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही. मी अगदी लहान वयात काम करायला सुरुवात केली, माझ्याकडे खूप काम असायचे. 1942 मध्ये, वयाच्या अगदी तेराव्या वर्षी, लताजींच्या डोक्यावरून वडिलांची सावली गेली. त्यामुळे कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांच्यावर आल्या.

चित्रपटांमध्ये कराव्या लागल्या छोट्या भूमिका -

लता मंगेशकर यांचे वडील शास्त्रीय संगीताचे मोठे चाहते होते, त्यामुळेच कदाचित ते लताजींच्या चित्रपटात गाण्याच्या विरोधात होते. 1942 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. यानंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आणि लता मंगेशकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारण्यास सुरुवात केली.