अमेरिकेमध्ये गायिका सोफिया उरिस्ता (Sophia Urista) आणि ब्रास अगेन्स्ट (Brass Aginst) ब्रँड यांचा चांगलाच बोलबाला आहे. या ब्रँडचे चाहते फक्त अमेरिकेमध्येच नाही तर जगभरात पसरले आहेत. आता या ब्रँडच्या एका लाईव्ह शो दरम्यान अशी गोष्ट घडली आहे, ज्यामुळे या ब्रँडची देशभरात नाचक्की होत आहे. तर या ब्रँडची सदस्य आणि अमेरिकन गायिका सोफिया उरिस्ताने तिच्या लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान तिच्या एका चाहत्याच्या चेहऱ्यावर लघवी केली. या बातमीवर विश्वास ठेवणे अवघड आहे, परंतु हे सत्य आहे.
अलीकडेच, डेटोना येथील वेलकम टू रॉकव्हिल फेस्टिव्हलमध्ये 'ब्रास अगेन्स्ट फ्रंटवुमन' द्वारे सादर केल्या जात असलेल्या शोचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये सोफिया उरिस्टा चक्क तिच्या चाहत्याच्या चेहऱ्यावर लघवी करताना दिसत आहे. अतिशय किळसवाणा हा व्हिडिओ असून, सोशल मिडीयावर याबाबत टीका होत आहे. ही घटना 11 नोव्हेंबर 2021 (गुरुवार) ची आहे. कार्यक्रमादरम्यानच आपण लघवी करणार असल्याची घोषणा सोफियाने आधीच केली होती.
We had a great time last night at Welcome to Rockville. Sophia got carried away. That's not something the rest of us expected, and it's not something you'll see again at our shows. Thanks for bringing it last night, Daytona.
— Brass Against (@BrassAgainst) November 13, 2021
सोफिया म्हणाली होती की, ‘एका व्यक्तीला एका डबा घेऊन तयार करा, कारण आता त्याला स्टेजवर आणले जाणार आहे आणि मी त्याच्या तोंडावर लघवी करणार आहे. मला लघवी करायची आहे परंतु सध्या मी बाथरूममध्ये जाऊ शकत नाही. म्हणूनच मी इथे करणार आहे.’ हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बँडने त्याबद्दल माफी मागितली आहे. आता ही संपूर्ण घटना सुनियोजित पद्धतीने घडवून आणली आहे की अचानक घडली आहे, याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही. (हेही वाचा: Bra-Hips Size For Marriage: व्यक्तीने मॅट्रिमोनी साइटवर होणाऱ्या नववधूसाठी दिली विचित्र जाहिरात; ब्रा, कंबरेसह पायाचे लिहिला आकार)
परंतु आपल्या ट्विटर हँडलवर बँडने लिहिले आहे की, ‘मुख्य गायिका सोफिया उरिस्ता खूप उत्साहित झाली होती. त्यावेळी जे घडायला नको ते घडले व त्याची आम्हाला अपेक्षा नव्हती. आमच्या शोमध्ये असे चित्र पुन्हा कधीही दिसणार नाही.’ बँडने संपूर्ण घटनेचे वर्णन ‘अत्यंत अनपेक्षित; असे केले आहे.
सोफिया उरिस्टानेही आपल्या या कृत्याबद्दल माफी मागितली आहे. ती म्हणते की, ‘मी स्टेजवरील संगीतावेळी नेहमीच मर्यादा ओलांडल्या आहेत. पण त्या रात्री, मी बर्याच सीमा ओलांडल्या. माझ्यासाठी मला माझे कुटुंब, बँड आणि चाहते हे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्वाचे आहेत. मला माहित आहे की मी काही लोकांना काय दुखवले किंवा नाराज केले आहे, ज्याबद्दल मी त्यांची माफी मागते.’