Bra-Hips Size For Marriage: व्यक्तीने मॅट्रिमोनी साइटवर होणाऱ्या नववधूसाठी दिली विचित्र जाहिरात; ब्रा, कंबरेसह पायाचे लिहिला आकार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Wikimedia Commons)

Bra-Hips Size For Marriage:  लग्न करायचे म्हणजे विविध गोष्टी पहाव्या लागतात. सुरुवात होते ती म्हणजे एखादा नववधू किंवा वर हा योग्य परिवारातून असण्यापासून ते त्याच्या कामापर्यंत. भारतात लग्नाबद्दल प्रत्येकाच्या वेगवेगळ्या फँन्टसी असतात. परंतु सध्या सोशल मीडियात एक व्हायरल होणाऱ्या जाहिरातीवरुन खुप चर्चा रंगली आहे. ती जाहिरात मुख्यत्वे नववधूसाठी आहे. त्यामध्ये वराने आपली होणारी बायको कशी असावी त्याचे अधिकच डिटेल्स लिहिले आहेत.

Reddit युजरने नुकत्याचा एका मॅट्रिमोनी साइटवर आपल्या होणाऱ्या बायकोच्या शोधात ती कशी असावी याबद्दल अधिक माहिती दिली आहे. त्यात त्याने महिलेच्या ब्रा, कंबर आणि पायाचा आकार किती असावा याबद्दल अधिक सांगितले. या व्यतिरिक्त तिचे एकूण व्यक्तिमत्व हे मॉर्डन जगाला साजेसे असेल असे असावे हे सुद्धा त्याने स्पष्ट केले आहे.(Shocking! शौचालयाचा वापर करत असताना व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला चावला किंग कोब्रा, जाणून घ्या त्यानंतर काय घडले)

Reddit वर जाहिरात शेअर केल्यानंतर पोस्ट व्हायरल झाली आहे आणि अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली जात आहे. हे वेगळे सांगायला नको, अनेकांनी त्या माणसाच्या मागण्या निरर्थक ठरवल्या आणि अशा विचित्र मागण्या केल्याबद्दल माणसावर टीका केली. एका युजरने लिहिले, "हा माणूस लेडीज टेलर काय आहे?" तर दुसर्‍याने लिहिले, "या माणसाला कॅरेक्टर कस्टमायझेशन हवे आहे, पार्टनर नाही. अरे देवा!" अनेकांना वाटले की हा एक प्रकारचा विनोद आहे आणि इतरांनी सांगितले की एखाद्या व्यक्तीसाठी असा जीवनसाथी शोधणे खरोखर कठीण आहे.