facebook hardik natasha

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने अभिनेत्री नताशा स्टॅनकोविसोबत फेब्रुवारी महिन्यात लग्न केले. उद्यपूर येथे भारतीय परंपरेने 14 फेब्रुवारीला दोघांनी लग्न केले. 2020 पासून नताशा आणि हार्दिक एकत्र होते. कोविड 19 च्या दरम्यान त्यांनी कोर्ट मॅरेज केले. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नताशाने तिच्या लग्नाचे काही आठवणीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत हार्दिक पांड्या 5 लाख रुपय देत असल्याचे दिसून येत आहे. हे 5 लाख रुपये त्यांनी मेहुणी पंखुरीला देत आहे. हिंदू संस्कृती प्रमाणे मेहूणी पंखुरी शर्माने हार्दिक पांड्याचे जुते चोरले, ह्याच बदल्यात पंखुरी शर्माने हार्दिक कडून 1 लाख रुपयाची मागणी केली आणि हार्दिकने त्याबदलात 5 लाख रुपये दिले. सोशल मीडियावर हार्दिक बद्दल खुप चांगले कंमेट येत आहे. नताशाने लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गेल्या महिन्यात हार्दिक अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये IPL 2023 च्या एम एस धोनीच्या चैन्नई सुपर किंगकडून पराभूत झाला. लवकरच तो वेस्ट इंडिज टी 20 सामन्याचे नेतृत्व करेल अशी सर्वांना आशा आहे.